११३
 १ परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.  २ परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.  ३ पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.  ४ परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.  ५ कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो.  ६ देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.  ७ देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.  ८ आणि देव त्या लोकांना महत्व देतो.देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.  ९ स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.