१२
 १ मोशेनें पराभूत केलेले राजेज्या राजांना ठार मरून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वीकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे :  २ अमोऱ्यांचा हेशबोननिवासी राजा सिहोन; आर्णोन खोऱ्याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील याब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गीलादावर,  ३ आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवारापासून बेथयशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्ह्यांजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किवा क्षारसमुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;  ४ उरलेल्या रेफाई लोकांत्ला बाशानाचा राजा असे;  ५ हर्मोन पर्वत सलका. गशुरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सिहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गीलादावर त्याची सत्ता होती.  ६ ह्यांचा मोड परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्त्राएल लोक ह्यांनीं केला होता; आणि परमेश्वराचा सेवक मोशी ह्यानें तो रऊबेनी, गादी व मनश्शेंचा अर्धा वंश ह्यानें वतन म्हणून दिला होता यहोशवानें पराभूत केलेले राजे  ७ यार्देनेच्या पश्चिमेस लबानोनखोर्यातील बालगादापासून सेईरास जाणाऱ्या घाटांतील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्त्राएल लोक ह्यांनीं केला ते हे : (हा देश यहोशवानें इस्त्राएलवंशाना त्भभयांच्या हिश्श्यांप्रमाणे वतन म्हणून दिला,  ८ तेथील डोंगराळ प्रदेशांत, तलवटींत, अराबांत, उतरणींत, रानांत आणि नेगेबांत, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.)  ९ यरीहोचा राजा, बेथलाच्या बाजूस जे आय त्याचा राजा,  १० यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा,  ११ यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा  १२ एग्लोचा राजा, गेजेराचा राजा,  १३ दबीराचा राजा, गेदेराचा राजा,  १४ हर्माचा राजा, अरादाचा राजा,  १५ लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.  १६ मक्केदाचा राजा बेथेलाचा राजा,  १७ तप्पुहाचा राजा, हेफेराचा राजा,  १८ अफेकाचा राजा, लशारोनाचा राजा,  १९ मादोनाचा राजा, हसोराचा राजा,  २० शिग्त्रोनमरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा,  २१ तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,  २२ केदेशाचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा,  २३ नाफत-दोर येथील दोराचा राजा, गीलगाल 1 येथील गोयीमाचा 2 राजा  २४ तिरसाचा राजा; ह्या प्रमाणे नगरागणीक एक असे एकंदर एकतीस राजे होते.