Jonah
योना
१ तर अमीताइचा पुत्र योना याजवळ परमेश्वराचे वाचन आले कि , २ तू उठून जी मोठी नागरी आहे तिकडे जा, आणि तिजला प्रवाद गाजवून सांग; कारण त्यांची दृष्टाई मझ समोर चढली आहे. ३ परंतु योना तर्शिशास पळून जावे म्हणून उठला ,आणि उतरत याफोस गेला.तेव्हा तर्शिशास जाणारे एक गलबत त्यास सापडले;मग तो त्याचा उतारा देऊन त्यासंगती तार्शिशाला परमेश्वरासामोरून जाण्यासाठी त्यावर चढला.
४ आणि परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला,आणि मोठे वादळ समुद्रात आले,मग गलबत फुटले अशी शंका झाली. ५ आणि नावडे भ्याले आणि प्रत्येक जन आपल्या देवाला हाक मारू लागले ,आणि गलबतात जे भारगत होते,त्यापासून गलबत हलके करावे ,म्हणू ते समुद्त्र टाकू लागले;परंतु योना गलबताच्या तळी उतरून आडवा पडून गाढ झोपेत होता. ६ मग तांडेल त्याजवाळ येऊन म्हणाले ,अरे निजणार्या ,तुझ्या मनात कायकाय आहे? तू उठ,आपल्या देवाला आरोळी मार,कदाचित देव आम्हास प्रसन्ना होईल,मग आम्ही नाश पावणार नाही ७ आणि ते एकमेकाला म्हणाले,याहो,आपण पण पडू जाणू कि कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे;मग त्यांनी पण पाडिले, आणि पण योनावर पडला. ८ तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, तू आम्हाला सांग कि कशा मुळे हे संकट आम्हावर आले आहे; तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोठल्या लोकांतला आहेस? ९ मग तयाने त्यास सांगितले कि मी इब्री आहे;आणि मी परमेश्वराला आकांशातल्या देवाला भितो,ज्या त्याने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली. १० तेव्हा ते मनुष्य अत्यन्त भयभीत झाले,आणि त्याला म्हणाले तू हे का केले आहे?कारण कि त्या मनुष्यांनी जाणले कि तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे. कां कीं त्याने असे त्यास सांगितले होते. ११ मग ते त्याला म्हाणाले समुद्र अमहावरून शांत व्हावा,म्हणून आम्ही तुझे काय करू? का कि समुद्र खळबळत आणि उसळत आहे. १२ तर तो त्यास म्हणाल तुम्ही मला उचलून समुद्रात टाका, म्हणजे समुद्र तुम्हावरून शांत होईल; कारण कि मी जाणतो मजमुळे हे मोठे वादळ तुम्हावर आहे. १३ तथापी त्या मनुष्यांनी गलबत तिरास आणायासाठीझटून व्हलविले;परंतु त्यांचा उपाय चालेना ;का कि समुद्र त्यांजवर खवळत व उसळत होता. १४ तेव्हा ते परमेश्वरास आरोळी मारत म्हणाले, हे पर्मेह्स्वरा,या मनुष्याच्या मुळे आम्ही नाश पावू नये,आणि निर्दोष रक्ताचा दोष आम्हाला लावू नये;का का कि हे परमेश्वरा ,जसे तुला वाटेल तसे तू केले आहे. १५ नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात टाकिले. तेव्हा समुद्र आपल्या खवळण्यापासून शांतन झाला. १६ मग त्या मनुष्यांनी परमेश्वराचे मोठे भय धरले,आणि परमेश्वरासाठी यज्ञन्य केले,आणि नवस केले.
१७ तर योनाला गिळावे म्हणून एक मोठा मासा सिद्ध केला होता.