३१
१ आणि पलिष्टी इस्त्राएलाशीं लढले, तेव्हां इस्त्राएल पलिष्ट्यांच्या पुढून पळून गिलबोवा डोंगरांत मारलेले पडले. २ आणि पलिष्टि शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्य्टांनी शौलाचे मुलगे योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारलें. ३ आणि शौलावर लढाई भारी पडली वधनुर्धारांनी त्याला गाठलें, आणि धनुर्धरांमुळे तो फार संकटात पडला. ४ तेव्हां शौल आपल्या श्त्रवाहकाला म्हणाला, तूं आपली तरवार उपसून तिनें मला आरपार ऊंसक, नाही तर हें बेसुंती येऊन मला ङोसकून माझी विटंबना करतील. परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना, कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तरवार घेऊन तुच्यावर पडला. ५ आणि शौल मेला हें पाहून त्याचा शस्त्रवाहकहि त्याप्रमाणें आपल्या तरवारीवर पडून मेला. ६ असे त्या दिवशी शौल व त्याचे तिघे मुलगे व त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व मनुष्य एकदम मरण पावले. ७ आणि इस्त्राएलांचीं माणयें पळालीं, आणि शौल व त्याचे मुलगे मेले हें इस्त्राएलांची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलिकडे होती त्यांनीं पाहिलें तेव्दां तीं आपलीं नगरें सोडून पळालीं; मग पलिष्टी येऊन त्यांत राहिले. ८ आणि दुसऱ्या दिवशीं असे झाले कीं पलिष्टी मेलेल्यांचीं वस्त्रे लुटायला आले तेव्हां त्यांना शौल व त्याचे तिघे मुलगे,गिलबोवा डोंगरांत पडलेले सांपडले. ९ तेव्हां त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली, आणि पलिष्ट्यांच्या देशांत चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या घरांत व लोकांना हे वर्तमान कळवायला त्यांनी मामसें पाठवलीं. १० आणि त्यांनीं त्याची शस्त्रे अष्टारोथाच्या घरांत ठेवली, आणि त्यांनी त्याचें प्रेत बेथृ शानाच्या भिंतास टांगले. ११ आणि बपलिष्ट्यांना शौलाला जे केलें त्याविषयीं जेव्हां यावेश-गिलादाच्या राहणाऱ्यांनीं एकलें १२ तेव्हां सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालले आणि त्यांनी शौलाचें प्रत व त्याच्या मुलांची प्रतें बेथ-शोनाच्या भितीवरून काढून याबेशाला आणल् व तेथें तीं जाळलीं. १३ मग तायंनीं त्यांचीं हाडें घेऊन याबेशात एशेल झाडाखालीं पुरलीं, आणि सात दिवस उपास केला.