1 Samuel
1 शमुवेल
१ ,एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील,रामाथाईम-सोफीम यातला एक माणूस होता,व त्चाचें नाव एलकाना, होते:तो यरोहामाचा मुलगा,तो एलीहूचा मुलगा,तो तोहचा लगा,तो सूफाचा मुलगा,तो एलकाना एफ्राईमी होता. २ , त्याला दोन बायका होत्या,एकीचे नांव हन्ना वदुसरीचे नाव पनिन्ना होते.पनिन्नेला लेकरे होती,परंतु हन्नेला लेकरे नव्हती. ३ .आणि तो माणूस नगराहून प्रतिवर्षि शिलो येथे सैन्यांचा यहोवाचे भजनपूजन करायला व यज्ञहि करायला जात असे.तेथे एलीचे दोन मुलगे ङफनी व फिनहास यहोवाचे याजक होते. ४ .आणि एलकानाने यज्ञ करायचा द्वस आला म्हणजे तो आपली बायको पनिन्ना हिला व तिचे सर्व मुलगे तिच्या सर्व मुली यांना वाटे देत एसे. ५ ,परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देई,कारण हन्नेवर तो प्रीती करत असे.पण यहोवाने तिचे गरिभस्थान बंद केले होते. ६ आणियहोवाने तिचे गर्भस्थान बद केले होते यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिचीवैरीण तिला फारच चिडवी. ७ आणि त्यानें प्रतिवर्षी असेच केले.डेव्हा ती यहोवाच्या मंदिरात दाई तेव्हा ही तिला असाच त्रास देई,म्हणून ती रडत असे व खात नसे. ८ .तेव्हा तिचा नवरा एलकाना तिला म्हणे,हन्ना,तू कां रडतेस?कां खात नाहीस? आणि तुझे ह्रदय कां दुखित आहे?मी तुला दहा मुलांपेक्षा बरा नाही काय? ९ मग त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली.आणि एली याजक मंदिराच्या खांबाजवळच्या आपल्या सिंहासनावर बसला होता. १० तेव्हा ती जिवात कडू अशी होती,आणि ती यहोवाजवळ प्रार्थना करून फार रडली. ११ आण नवस करून बोलली,हे सैन्याच्या यहोवा, जर तू आपल्या दासीचे दुख पाहशीलच व माझी आठवण करशील,व तुझ्या दासीला विसरणार नाहीस वदोसीला पुरूष संतान देशील,तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात यहोवाला देईल, आणि वस्तरा त्याच्या डोक्यावर फिरणार नाही. १२ आणि असे झाले की, ती यहोवाच्यापुढे प्रार्थना करीत असतां एलीने तिच्याच्या तोंडाकडे लक्ष लवलें. १३ . हन्न् तर आपल्या ह्रदयात बोलत होती,तिचे ओठ मात्र हालले, पण तिची वाणी ऐकू आली नाही,म्हणून ती दारू प्याल्यामुळें मस्त झालेली असेल असें एलीला वाटले. १४ तेव्हां एली तिला म्हणाला,केवढा वेळ तू मस्त राहशील?तूं आपले मद्य आपल्यापासून दूर कर. १५ आणि हन्ना उत्तर करून म्हणाली,असे नाहीं,माझ्या प्रभू,मी दुखित आत्म्याची बायको आहें,द्राक्षारस किंवा मद्य मी प्यालें नाही, तर मी आपला जीव यबोवापुढें ओतला आहें, १६ . तुझी दासी दुष्ट बाई आहे असें तू गणू नको,कारण माझे क्लेश व यातना यांमुळे मी येथवर बोलले आहें. १७ मग एली उत्तर करून बोलला,सुखरूप जा व इस्त्राएलाचा देव याच्यापाशी जें मागणें तूं मागितले ते तो तुला देवो. १८ . ती बोलली,तुझ्या, दासीवर तुझी कृपादृष्टी होऊ दे. मग ती बायको निघून आपल्या वाटेनें गेली, आणि तिनें खाल्लें व पुढें तिचे तोंड उदास नव्हते. १९ आणि सकाळी त्यांनी उठून यहोवाचे भजनपूजन केले;मग ती निघून रामा येंथें आपल्या घरीं गेली.आणि एलकानानें आपली बायको हन्ना दिला जाणले व यहोवानें तिची आठवण केली. २० . आणि असें झाले की, नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिलीव तिनें मुलाला जन्म दिला आणि तिनें त्याचें नाव शमुवेल(म्हणजे देवापासून मागितलेला) असे ठेवलें;ती म्हणाली,कारण मी त्याला यहोवापासून मागून घेतलें. २१ आणि तो माणूस एलकाना आपल्या सर्व कुटुंबासुधादां यहोवाला वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला. २२ परंतु हन्ना वर गेली नाही,कारण ती आपल्या नवऱ्याला म्हणाली , मुलाचे दूध तोडीपर्यत मी वर जाणार नाही,मग मी त्याला नेईल;आणि तो यहोवापुढे हजर होईल व तेथेनेहमी वस्ती करील. २३ रेव्हां तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला, तुला बरे वाटतें ते कर;तूंत्याचें दूध तोडीपर्यत राहा;केव ळ यहोवा आपले वचन स्थापित करो.मग ती बायको घरीं राहिली, व आपल्या मुलाचें दूध तोडीपर्यत तिने त्याला स्तनपान दिलें. २४ आणि त्याचें दूध तोडल्यावर,तिने तीन गोर्हे वएक एफाभर सपीठ वद्राक्षारसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्याला शिलो येथें यहोवाच्या मंदिरात नेले;तेव्हे मूल लहान होतें. २५ मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले. २६ आणि ती म्हणाली, माझ्या प्रभू,तुझा जीव जिवंत आहे;माझ्या प्रभूजी बायको यहोवाची प्रर्थना करीत येथें तुझ्याजवळ उभी राहिली होती ती मीच आहें. २७ यामुलासाठीं मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मीं यहोवापाशीं मागितली होता ती त्यानें मला दिली आहे. २८ म्हणूनच मी तो यहोवाला उसना दिला आहे,तो वांचेल तोपर्यत तो यहोवाला उसना दिलेला आहे,तेव्हां तेथें त्यानें यहोवाचें भजनपूजन केलें.