१ ,मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली,माझे ह्रदय यहोवाच्या ठायी.आनंद पावत आहे,माझे शृंग, यहेवाच्या ठायी इंच केललें आहे,माझें मुख माझ्या शत्रूवर मोठे केलेले आहे, कारण मी तुझ्या तारणांत आनंद पावलें आहे. २ यहोवासारखा कोणी पवित्र नाही,कारम तुझ्यावाचून कोणी नाही;आमच्या देवासारखा कडकही कोणी नाही. ३ .अति गर्विष्टपणाने आणखी बोलूं नका;तुमच्या रोंडातून बढाई न निघो,कारण यहोवा ज्ञानाचा देव आहे;त्याच्याकडून कृत्यें तोललीं जातात. ४ पराक्रम्याचीं धनुष्यें मोडलेली आहेत,आणि जे अडखळले तेबलानें वेष्टीलेल अहेत. ५ जे तृपेत होते ते अन्नासाठीं मोलमजुरी करीत आहेत,आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत; जी वांझ होती तिनें सातात जन्म दिला आहे,आणि जिला फार लेकरें आहेत ती अशक्त झाली आहे. ६ यहोवा जिवें मारतो व जिवंत करतो; तो अधोलोकास नेतो ववर आणतो; ७ यहोवा दरिद्री करतो व धनवान करतो; तो नीच करतो,तो उंचपि करतो,तो दरिद्र्याला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उङें करतों; ८ यासाठी कीं त्यांना सरदारांमध्यें बसवावे व त्यांना गौरवाते सिंहासन प्रप्त व्हावें;कारण पृथ्वीचे खांब यहोवाचे आहेत, त्यानें त्यांवर जग ठेंवले आहे. ९ तो आपल्या भक्तांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारांत नि:शब्द केले जातील, कारण बळानें कोणी माणूस प्रबल होणार नाही, १० यहोवाशी विरोध करणारे फोडून टाकले जातील; आकाशांतून तो त्याच्यावर गर्जना करील;यहोवा पृथ्वीच्या शेवटांचा न्याय करील;तो आपल्या राजाला शक्ति देईल,आणि आपल्या अभिषिक्ताचें शृंग उंच करील. ११ मग एलकाना रामा येथें आपल्या घरीं गेला.आणि तो मूल एली जायजकासमोर यहोवाची सेवा करूं लागला. १२ एलीते मुलगे नीच माणसें होतें ;ते यहोवाला ओळखत नव्हते. १३ आणि लोकांजवळ त्यायाजकांची रीत अशी होती कीं कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करूं सागला तेव्हां मांस शिजत असतां याजकाचा चाकर मांस उचलण्याची आंकडी आपल्या हातीं घेऊन येई, १४ व परातीत किंवा तपेल्यांत, किंवा कढईत,किंवा पातेल्यांत ती मारी, आणि जें सर्व आंकडी धरून काढी तें याजक आपणासाठी घेई;जे इस्त्राएल शिलो येथें येत त्या सर्वांना ते तसेच करीत असत, १५ आणि त्यांनी मेद जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत णसे कीं,याजकासाछी मांस भाजण्यास दे, कारण तो तुझ्यापासून शिजलेलें मांस घेणार नाहीं,तर कच्चेंघेईल. १६ आणि जर त्या मनुष्यानें त्याला असे म्हटले की,अगोदर ते मेद जाळतीलच मग तुझ्या जिवाती इच्छा होईल तेवढें तूं घे;तर तो म्हणे,असे नको,पण तूं आतांच दे,नाही तर तें मी बळानें घेईन. १७ हें त्या तरुणांचे पाप यहोवाच्यापुढें फार मोठें होतें, कारण मनुष्यें यहोवाच्या अर्पणाला कंटाळली. १८ शमुवेल मूल तर तागाचें एफोद कमरेस वेष्टिलेला असतां यहोवाचीं सेवा करीत होता. १९ आणि त्याची आई त्याच्यासाठीं लहान अंगरखा करीत असे,आणि तो अंगरखा आणून त्यालादेत असे, २० आणि एलकानाला व त्याच्या बायकोला एली आशीर्वाद देऊन म्हणत असे,जें तुम्ही यहोवाला उसने दिलें त्याबद्दल यहोवा या बायकोपासून तुला संतान देवो,मग तीं आपल्या घरी जात असत, २१ आणि यहोवानें हन्नेती भेट घेतली म ती गरोदर झाली,तिनें तीन मुलांनाव दोन मुलींना जन्म दिला, आणि शमुवेल मूल यहोवाच्यासमोर वाढत गेला. २२ आणि एली फार म्हातारा होत,आणि आपले मुलगे सर्व इस्त्रेलांशीं कसे वागले आमि सभामंडपाच्या दाराजवळ ज्या बाया सेवा करीत त्यांच्यांपाशीं ते कसे निजले,हें सर्व त्यानें ऐकलें. २३ तेव्हा तो त्यांना म्हणाला,तुम्ही अशीं कृत्यें कां करतां? कारण त्यां तुमची कुकर्में या सर्व लोकांपासून मी ऐकत आहें. २४ माझया मुलांनो, असें करू नका,कारण जें वर्तमान मी ऐकतों ते बरें नाहीं;तुम्ही यहोवाच्या लोकांना अपराध करायला लावतां. २५ जर कोणा माणसानें माणसांविरुध्द पाप केलें तर त्याच्यासाठी कोण विनंती करील?तरी ते आपल्या बापाचा बोध ऐकेनात.कारण त्यांना जिवें मारावें असें यहोवाच्या मनांत होतें. २६ आणि शमुवेल मुलगा मोठा होत चालला,आणि यहोवाच्या व मनुष्यांच्याहि कृपेत चांगला वाढत होता. २७ आणि देवाचा अक माणूस एलीकडे येऊन म्हणाला,यहोवा असें ण्हणतो,तुझ्याबापाचें घराणें मिसरात फारोच्या घरी दास्यात राहत असतां मी त्याला प्रगट झालों नाहीं काय? २८ आणि त्यानें माझा याजक व्हावें, माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरतीं जावें, माझ्यासमोर एफोद धारण करावें म्हणून मीं त्याला सर्व इस्त्रएलाच्या वंशारून निवडून काढले नाही काय? आणि इस्त्राएलाच्या संतानांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या बापाच्या घराण्याला दिलू नाहीत काय? २९ तर तुम्ही जो माझा यज्ञ व जें माझें अर्पण मी आपल्या मंदिरात आज्ञापिलें त्यांना तुम्ही कां लाथ मारतां? आणि माझे लोक इस्त्राएलयांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांना तूं कां अधिक मानतोस? ३० यामुळे यहोवा इस्त्राएलांचा देव म्हणतो की,तुझे घराणें वतुझ्या बापाचे घराणें माझ्यासमोर निरंतर चालेल, असें मां म्हटलें खरे/; परंतु आतां यहोवा असें म्हणतो,ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो,कारण जे मला मानतात त्यांचा मान मी करीन,आणि जे मला तुच्छ मानतात ते अवमान पावतील. ३१ पाहा,असे दिवस येत आहे की ज्यात मी तुझा भुज व तुझ्या बापाच्या घराण्याचा भुज कापून टाकीन, आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही. ३२ आणि इस्त्राएलाला जें सर्व वैभव देव देईल त्यामध्यें माझ्या व,तीत तूं शत्रूला पाहाशील, आणि तुझ्या घराण्यात कधी कोणी म्हातारा होणार नाही. ३३ आणि तुझा जो माणूस मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या ह्रदयाला खेद देणारा होईल, व तुझ्या घराण्याची लर्व तंतति ऐन तरुणपणातं मरेल. ३४ आणि तुझे दोघे मुलगे हफनी व फिनहास यांच्यावर जें येईल तेंच तुला चिन्ह होईल; ते दोघेहि एकाच दिवशीं मरतील. ३५ आणि मी आपणासाठीं विश्र्वासू याजक उभा करीन; तो माझ्या ह्रदयात व माझ्या अभिशिक्तापुढें तो निरंतर चालेल. ३६ आण असें होईल कीं तुझ्या घराण्यात जो कोणी राहिलेलाव असेल तो येऊन रुपाच्या तुकड्यासाठीं व भाकरीच्या तुकड्यासाठीं त्याच्यापुढे नमन करील,आणि म्हणेल की,मी तुला विनंती करतों, मीं भकरीचा तुकडा खावा म्हणून मला याजकपदांतलें एखादें काम दे.