१ आणि शमुवेल मूल अलीच्यासमोर यहोवाची सेवा करीत होता;आणि यहोवाचें वचन त्या दिवसात विरळ होते, वारंवार कांही दर्शन होत नव्हते, २ आण त्या वेळेस असें झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता; आणि त्याचे डोळे मंद झाल्यामुळें त्याला दिसत नव्हते; ३ आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता,आणि देवाचा कोश यहोवाच्या मंदिरात होता तेथें शमुवेलनिजला होता, ४ आणि यहोवानें शमुवेलाला हाक मारली, तेव्हां तो म्हणाला, मी येथें आहें. ५ मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला,मी येथे आहे,कारण तूं मला बोलावलें. आणि त्यानें म्हटले,मी बोलावले नाही, परत जाऊन नीज.तेव्हा तो जून निजला. ६ मग यहोवानें, शमुवेला,अशी हाक मारली;तेव्हा शमुवेल उछून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथें आहे,कारण तू मला बोलावले.त्याने उत्तर केलें, माझ्या मुला, मी बोलावले नाही,परत जाऊन नीज. ७ शमुवेलानें तर अजून यहोवाला ओळखले नव्हते, आणि यहोवाचे वचन अजून त्याला प्रगट झालें नव्हतें. ८ .मग यहोवाने शमुवेलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली; तेव्हा तो उठून अलीकडे जाऊन म्हणाला , मी येथे आहें,कारण तू मला बोलावले. ९ तेव्हां एलीला समजले की, यहोवाने मुलाला हाक मारली आहे. मग अली शमुवेलाला म्हणाला, तूं जून नीज, आणि असे होऊ दे की जर तो तुला मारील तर असे म्हण, हे यहोवा, बोल, कारण तुझा सेवक एकत आहे. मग शमुवेल जाऊन आपल्या ठिकाणी निजला. १० आणि यहोवा येऊन उभा राहिला, आणि पबर्वीप्रमाणें त्यानें, शमुवेला, शमुवेला,अशी हाक मारली, रेव्हां शमुवेल म्ङमाला,बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. ११ मग यहोवानें शमुवेलाला म्हटलें, पाहा, इस्त्राएलात मी अशी एक गोश्ट करणार आहें कींजो कोणी ती ऐकेल त्याचे दोन्ही वान भणभणतील, १२ जें मीं एलीच्या घराण्याविषयीं सांगितले तें सर्व र्ररंभापासून शेवटपरियत मी त्या दिवशीं त्याच्या विरुध्द करीन. १३ कारण मीं त्याल सांगितले की,जो अन्याय त्याला माहित आहे त्यामुळें मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन,कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला, तरी त्यानें त्यांना आवरले नाही. १४ यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की,यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीहि दूर होणार नाही. १५ नंतर शमुवेल सकाळपर्त निजला;मग त्यानें यहोवाच्या मंदिराची दारें उघडली;पण शमुवेल एलीला हा साक्षात्कार कळवायला भ्याला. १६ मग एलीनें शमुवेलाला हाक मारून म्हटलें, माझ्या,शमुवेला.तेव्हां तो म्हणाला,मी येथे आहें. १७ मग त्यानें म्हटलें,जी गोष्ट यहोवा तुझ्याशी बोलला ,ती काय आहे? मी तुला विनती करतो, ती माझ्यापासबन गुप्त ठेवू नका;ज्या गोष्टी त्याने तुला सांगितल्या त्यांतलें कांही जर तू माझ्यापासून गुप्त ठेवशील तर देव तुझे तसें व त्यापेक्षां अधिकही करो, १८ तेव्हाम शमुवेलानें सर्व गोष्टी त्याला सांगितल्या,व त्याच्यापासून कांही गुप्त ठेवले नाही.मग तो म्हणाला,तो यहोवा आहे;त्याला बरे वाटेल ते तो करो. १९ आणि शमुवेल वाझत गेला आणि यहोवा त्याच्यासेगती होता,आणि त्याने त्याच्या सर्व गोष्टीतून काही खाली पडू दिले नाही. २० आणि शमुवेल यहोवाचा भविश्यवादी व्हायला स्थपिलेला आङे, असें दानापासून बैर- शेब्यापर्यत सर्व इस्त्राएलांनी ओशखलें. २१ आणि शिलोत यहोवा पुन; दिसला,कारण यहोवा शिलो येथें यहोवाच्या वचनाकडून शमुवेलाला प्रगट झाला.