१ .आणि असें झाले की शमुवेल म्हातारा झाल्यावर त्यानें आपले मुलगे इस्त्राएलावर न्यायाधीश नेमले. २ त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाते योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असें होते; बेरशेबा येथें ते न्यायाधीश होते. ३ परंतु त्याचे मुलगे त्याच्या मार्गाने चालत नसत, तर लाभाकडे वळून लांच खाऊन न्याय विपरीत करीत एसत. ४ मग इस्त्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथें शमुवेलाकडे आले. ५ आणि ते त्याला म्हणाले,पाहा, तूं म्हातारा झालास,आणि तुझे मुलगे तुझ्या मार्गाने चालत नाहीत; आतांसर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमून ठेव. ६ परंतु आमचा न्याय करायला आम्हांला राजा दे,असे जें त्यांनी म्हटले त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटलें.मग शमुवेलानें यहोवाची र्रर्थना केली. ७ तेव्हा यहोवा शमुवेलास म्हणाला, लोक सांगतात त्या त्या सर्वात तूं त्यांचा शब्द ऐक, कारण त्यांनी मला नाकारले आहे. ८ मी त्यांना मिसरातून वर आणलें त्या दिवसापासून आजपर्यत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हें केले आहे, आणि मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली; तसेंच त्यांनी तुझ्याशी केलें आहे, ९ तर आतां त्यांची वाणी अक, तथापि तूं त्याच्याशीं खडसावून बोल व जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग. १० मग शमुवेलानें आपणाशीं ज्या लोकांनी राजा मागितला होता तांना यहोवाची सर्व वचनें सांगितलीं. ११ आणि त्यानें म्हटलें, जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे मुलगे घेऊन आपल्या रथांसाठीं व आपले स्वार होण्यासाठीं ठेवील, आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील. १२ आणि तो त्यानाआपले हजारांचे सरदार नेमून ठेवील,आणि जमीन नांगरायला व आपली पिकें कापायला व आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील. १३ आणि तो तुमच्या मुली हलवाइणी व स्वयंपाकिणी व पोळ्या करणारिणी होण्यास घेईल. १४ आणि तुमचीं शेतें व तुमचे द्राक्षमळे व तुमचे जैतुनाचे मळे जे उत्तम ते घेऊन तो चाकरांना देईल. १५ आणि तुमची पिकें व तुमचे द्राक्षमळे चांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल, १६ आणि तुमचे दास, तुमच्या दासी व तुमचे चांगले तरुण व तुमचे गाढव घेऊन तो आपल्या कामाला लावील. १७ तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल. १८ आणि त्या दिवसात तुम्ही आपणांसाठी निवडलेल्या राजामुळें ओरडाल, परंतु यहोवा त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही. १९ पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, असें नाही,तर आम्हांवर राजा पाहिजेच; २० म्हणजे आम्ही दुसऱ्या सर्व राष्ट्रासारखे होऊ; आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हांपुढे चालून आमच्या लढाया लढेल, २१ आणि शमुवेलाने लोकांते सर्व ऐकून यहोवाच्या कानात सांगितले, २२ मग यहोवा शमुवेलाशी बोलला,तूं त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव,तेव्हां शमुवेल इस्त्रएलाच्या मनुष्यांना म्हणाला,तुम्ही प्रत्येक आपापल्या नगरास जा.