१२
१ आणि शमुवेलानें सर्व इस्त्राएलास म्हटलें, पाहा, जें तुम्हीं मला म्हटलेम त्या सर्वाविषयी मी तुमचा शब्द ऐकून तुमहांवर एक राजा नेमला आहे. २ तर आतां पाहा, राजा तुम्हांपुढे चालत आहे आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालों आहें, आणि पाहा, माझे मुलगे तुम्हाजवळ आहेत वमी आपल्या तरुणपणासून आजपर्यत तुम्हापुढे चाललो आहे. ३ मी येथे आहा; यहोवाच्यासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूध्द साक्ष द्या;मी कोणाचा बैल घेतला काय?मी कोणाचा गाढव घेतला काय? ४ मी कोणाला फसवले काय? मी कोणावर बल्त्कार केला काय?किंवा कोणाच्या हातून काही घेतलेहि नाही. ५ मग तो त्यांना म्हणाला, माझ्या हाती तुम्हास काही सापडलें नाही याविषयी आज यहोवा तुमच्यासंबंधानें साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे. आण ते म्हणाले,तो साक्षी आहे. ६ नंतर शमुवेव लोकांना म्हणाला,ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले,आमि ज्याने तुमच्या वडिलांना मिसत देशातून काढून वर आणलें तो तर यहोवाच आहे. ७ तर आता स्थिर उभे राहा,म्हणजे यहोवाने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हांसाठी व तुमच्या वडिलांसाढी केली त्याविषयी मी यहोवासमोर तुम्हास बोध करतो ८ याकोब मिसरात गेल्यावर तुमच्या वडिलांनी यहोवाकडे आरोळी केली,तेव्हा यहोवाने मोशेला व अहरोनाला पाठवले, त्यांनी तुमच्या वडिलांना मिसरातून काढून आणले आणि याठिकाणी वसवले. ९ पण यहोवा त्यांचा देव याला ते विसरले,तेव्हा त्यानें त्यांना हासोराचा सेनापति सीसरा याच्या हाती व पलिष्ट्यांच्या हाती व मवाबाचा राजा याच्या हातीं त्यांना विकले,आणि हे त्यामच्याशीं लढले. १० तेव्हां ते यहोवाला हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण आम्ही यहोवाला सोडून बाल देव आणि अष्टारोथ यांची सेवा केली आहे,परंतु आता तूं आमच्या शत्रूच्या हातांतून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू. ११ मग यहोवानें यरुब्बाल बदानव इफताह व शमुवेल यांना पाठवून तुम्हाला तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवलें, आणि तुम्ही स्वस्थ राहिलां. १२ परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हावर आला असें तुम्ही पाहिलें तेव्हा तुम्हा मला म्हटले की,असें नको,तर आम्हावर राजा राज्य करो; तेव्हां यहोवा तुमचा देव तुमचा देव राजा होता. १३ तर आता जो राजा तुम्हीं निवडला, ज्याला तुम्ही मागितलें तो पाहा; आणि पाहा,यहोवानें तुम्हावर राजा ठेवला आहे. १४ जर तुम्ही यहोवाचें भय धरून त्याची सेवा कराल व त्याची वाणी ऐकाल आणि यहोवाच्या आज्ञेविरुध्द बंड करणार नाही, आणि जर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाहि, यहोवा तुमचा देव याला मानीत जाल तर बरे . १५ परंतु तुम्ही यहोवाची वाणीन ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरुध्द बंड कराल तर यहोवाचा हात जसा तुमच्या वडिलांविरुध्द होता तसा तो तुमच्याविरुध्द होईल. १६ तर आतं स्थिर उभे राहा, आणि जी मोठी गोष्ट तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा. १७ आज गव्हाची कापणी आहे की नाही!यहोवाला मी होक मारीन, अशासाठी की,त्यानें गर्जना व वृष्टी पाठवावी, मग तुम्ही जाणालव पाहाल कीं तुम्ही आफणांसाठीं राजा मागितल्यानं यहोवाच्या दृष्टींत जें दुष्टपण केलें, तें तुमचे दुष्टपण मोठेच आहे. १८ तेव्हां शमुवेलानें यहोवाला हाक मारली आणि त्या दिवशी यहोवानें गर्जना व वृ,टि पाठवली, मेहणून लर्व लोकांना यहोवातें व शमुवेलाचें फार भय वाटलें. १९ तेव्हा अवघे लोक समुवेलाला म्हणाले, आम्ही मरू नये म्हणून यहोवा तुझा देव याच्यापाशीं तूं आपल्या सेवंकांसाठी प्रार्तना कर, कारण आम्हीं राजा मागितल्यानें आपल्या सर्व पापांस आणखी हें दुष्कर्म जोडलें आहे. २० मग शमवेल लोकांना म्हणाला, भिऊ नका, तुम्ही हें सर्व दु,कर्स केले आहे खरे, तथापि यहोवाला एनुसरण्याचे सोडून भलरीकडे फिऱू नका, तर आपल्या संपूर्ण ह्रदयानें यहोवाची सेवा करा. २१ आणि तुम्ही भलतीकडे फिरू नका,कारण जे उपयोगी नाहीतव ज्यांच्यानें रक्षण करवत नाही अशांकडे कशाला जावे?कारण ते व्यर्थच आहेत. २२ कारण तुम्हाला आपले लोक करणे हें यहोवाला बरे वाटले, यामुळें यहोवा आपल्या मोठ्या नावाकरिता आपले लोक टाकून देणार नाही! २३ आणि मी तुम्हांसाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी यहोवाच्या विरूध्द पाप करावें हे माझ्यापासून दूरच असो, परंतु चांगला व सरळ मार्ग मी तुम्हांस शिकवीन, २४ केवळ यहोवाला भ्या, आणि खरेपणांत वागून आपल्या संपूर्ण ह्रदयाने तुम्ही त्याची सेवा करा, काऱण त्यानें तुम्हासाठी केवढीमोठई कृत्ये केली आहेत हें तुम्ही ध्यानांत आणा. २५ परंतु जर तुम्ही आणखी दुष्टाई कराल तर तुम्ही नाश पावाल व तुमचा राडाहि नाश पावेल.