२०
१ आणि दावीद रामा य़ेथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला,मी काय केलें आहे? माझा अपराध काय? आणि तुझ्या बापाच्यापुढें माझें काय पाप झालें आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे? २ तेव्हां त्यानें त्याला म्हटलें, असें न होवो, तूं मरणार नाहीस; पाहा, माझा बाप लहान मोठें कांहीएक कार्य मला सांगितल्यावांचून करीत नाही, तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असें होणार नाही. ३ मग दावीद शपथ वाहून म्हणाला,तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हें तुझा बाप खचित जाणतो म्हणून तो म्हणतो, हें योनाथानाला कळूं नये, कळले तर त्याला दुख होईल; परंतु खरोखर, यहोवा जिवंत आहे, व तुझा जीव जिवंत आहे, माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे. ४ तेव्हा योनाथान दावीदाला म्ङाला,जें कांही तुझा जीव इच्छीतो तें मी तुझ्यासाठी करीन. ५ आणि दावीद योनाथानाला म्हणाला, पाहा, उद्द्यां अमावस्या आहे तेव्हां मी राजाबरोबर जेवण्यास बसायला चुकू नये;परंतु मला जाऊं दे, परवां संध्याकाळपर्यत मी रानांत लपून राहील. ६ जर तुझ्या बापानें माझी आठवण काढलीच तर सांग की दावीदाने आपले गांव बेथलहेम येथें जायला माझ्यापाझी आग्रह करून रजा मागितली, कारण तेथएं त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे. ७ जर तो बरें म्हणेल तर तुझ्या दासाला शांति प्राप्त होईल, परंतु जर त्याला राग आला तर त्यानें माझें वाईट करण्याचा निश्र्चय केला आहे असें जाण. ८ यास्तव तूं आपल्या दासावर कृपा कर, कारण तूं आपल्या दासाला आपल्याबरोबर यहोवाच्या करारात आणले आहे;तथापि माझ्या ठायीं अन्याय असला तर तूंच मला जिवें मार; तूं आपल्या बापाजवळ मला कां आणावे? ९ तेव्हां योनाथान म्हणाला,तुला असें न होवो,माझ्या बापानें तुझे वाईट करण्याचा निश्र्चय केला आहे,असें मला खचित समजलें तर मीं तें तुला सांगू नये काय? १० तेव्हां दावीद योनाथानाला म्हणाला,जत कदाचित तुझा बाप तुला कठोर उत्तर देऊल तर मला कोण सांगेल? ११ आणि योनाथान दावीदाला म्हणाला,चल आपण रानात जाऊं,मग ते दोघे बाहेर रानात गेले. १२ आणि योनाथान दावीदाला म्हणाला यहोवा इस्त्राएलाता देव साक्षी असो,उद्यां किवा परवां या वेळेस मी अपल्या बापातें मन पाहीन, तेव्हा पाहा,जर दावीदाविषयीं त्याचे मन चांगले असेल तरमी तुझ्याकडे निरोप पाठवून तें तुला कळवणार नाही काय़? १३ जर तुझें वाईट करावे असें माझ्या बापाला वाटलें, आणि जर मीं ते तुला कळवले नाही आणि तूं शांतीने जावें म्हणून मीं तुला रवाना केले नाही,तर यहोवा योनाथानाचे तसें व त्यापेक्षां अधिकही करो, आणि यहोवा जसा माझ्या बापासंगती होता तसा तो तुझ्यासंगती असो. १४ आणि मी जिवंत आहें तोपर्यत माझा घात होऊ नये म्हणून तूं यहोवाची प्रमदया माझ्यावर करावी असें केवळ नाही, १५ तर तूं आपली कापा माझ्या घराण्यावरून कधीधी काढूं नको; यहोवा दावीदाचा प्रत्येक शत्रु भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढूं नको; १६ आमि यहोवाने दावीदाच्या घराण्याशींकरार करून म्हटलें, यहोवा दावीदाच्या शत्रुंच्या हातून याची झडती घेवो. १७ मग योनाथानानें दावीदाकडून, त्याच्यावरच्या आपल्या प्रीतीकरितां, आणखी शपथ वाहवली, कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्यानें त्याच्यावर प्रीति केली. १८ आणि योनाथान त्याला म्हणाला, उद्यां अमावस्या आहे, आणि तूं नाहीस म्हणून कळेल, कारण तुझें बसण्याचे टिकाण रिकामें राहील. १९ आणि तूं तीन दिवस राहिल्यावर लवकर इतरून, तें कार्य घडले त्या दिवशीं ज्या ठिकाणीं तूं लपला होतास तेथें येइन अजेल दगडाजवळ राहा. २० मग पाहा, मी पोराला पाठवून म्हणेन, जा, बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणेन,पाहा, बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तूं ये; २१ कारण तुझे कुशल आहे, आणि तुझे वाईट होणार नाहीं; यहोवा जिवंत आहे. २२ परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा, बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तूं निघून जा, कारण यहोवानें तुला पाठवून दिलें आहे. २३ रमि जी गोष्ट तूं व मी बोललो आहों तिच्याविषयी तर पाहा, यहोवा तुझ्यामध्यें व माझ्यामध्यें निरंतर आहे. २४ मग दावीद रानात लपून राहिला, आणि अमावस्या आली तेव्हां राजा जेवायला बसला. २५ आणि राजा आपल्या आसनावर, जसा इतर वेळीं तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाची डागा रिकामी होती. २६ तरी शौल त्या दिवशीं कांहीं बोलला नाही.कारण त्याला कांहीं झालें असेल,खचित तो शुध्द नसेल, असे त्याला वाटलें. २७ मग अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी असे झालें कीं दावीदाची डागा रिकामी होती, आणि शौलानें आपला मुलगा, योनाथान याला म्हटलें, इशायाचा मुलगा काल व आजहि जेवायला कां आला नाहीय़ २८ रेव्हां योनाथानाने शौलाला उत्तर दिलें की, दावीदानें, वेथलहेमास जायला आग्रहाने माझ्यापाशीं रजा मागितली. २९ तो म्हणाला, मा तुला विनंती करतों, मला जाऊं दे, कारण आमचें घराणें नगरात यज्ञ करणार आहे, आणि मला माझ्या भावानें आज्ञा केली आहे, म्हणून आतां तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊं दे.यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही. ३० तेव्हां योनाथानावर शौलाचा राग पेटला, तो त्याल म्हणाला, अरे विपरीत फितूर खोर बायकोच्या मुला, तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तूं इशायाच्या मुलाशी जडलास हें मला ठाऊक नाही काय? ३१ कारण जोपर्यत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे,तोपर्यत तूं आणि तुझे राज्यहि स्थापित होणार नाही म्हणून आतां माणसे पाठवून त्याला माझ्याकडे आम, कारण त्याला खचित मेले पाहिजे. ३२ मग योनाथानानें आपला बाप शोल याला इत्तर देऊन म्हटलें, त्याला, कशासाठी मारावे?त्यानें काय केलें आहे? ३३ तेव्हां शोलानें त्याला मारायला भाला फएकला. यावरून योनाथानाला कळलें की, आपल्या बापाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्र्चय केला आहे. ३४ मग योनाथान फार रागें भरून पमक्तून उठला, आणि महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यानें कांही अन्न खाल्ले नाही, कारण दावीदाविषयीं त्याला वाईट वाटलें, कारण त्याच्या बापानें त्याचा अपमान केला. ३५ मग असें झालें की योनाथान सकाळीं दावीदाशी नेमेलेल्या वेळेस आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला. ३६ आणि तो आपल्या पोराला म्हणाला,धाव, आतां मी बाण मारतों, त्यांचा शोध कर. आणि पोर धावत असतां त्याने त्याच्या पलिकडे बाण मारला. ३७ आणि जो बाण योनाथानानें मारला होता त्याच्या ठिकाणावळ पोर पोहचला तेव्हां योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही? ३८ आणि योनाथानानें पोराच्या मागून हाक मारली की, धाव , लवकर, पळ थांबू नको. ३९ मग पोराला कांहीच ठाऊक नव्हते, योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती. ४० आणि योनाथानानें आपलीं हत्यारें आपल्या पोराला दिलीं, व त्याला म्हटले, चल, ही उचलून घेऊन नगरांत जा. ४१ आणि पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपढा पडला व तीन वेळां नमला;तेव्हां ते एकमेकांचें चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले, पण दावीद अदिक रडला. ४२ आणि योनाथान दावीदाला म्हणाला, शांतीनें जा, कारण आपण दोघांनी यहोवाच्या नांवाने शपथ वाहून म्हटले आहे की, माझ्यामध्यें व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्यें व तुझ्या संतानामध्यें यहोवा सर्वकाळ असो, मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरांत गेला.