२५
१ आणि शमुवेल मरण पावला तेव्हां सर्व इस्त्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला, आणि त्यांनी त्याला रामा य़ेथें त्याच्या घरांत पुरले. आणि दावीद उठून खाली पारान रानांत गेला. २ आणि मावोनांत एक माणूस होता त्याची मालमत्ता पर्मेल येथें होती; तो माणूस फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरें व एक हजार बकरी होती; आणि तो आपली मेंढरें कर्मेलांत कातरीत होता. ३ त्यापुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या बायकोचें नाव अबीगईल होतें; बायको तर बुध्दीने चांगली व सुंहर रूपाती होती, परंतु पुरूष कठोर व करणीने दुष्ट होता; तो कालेबाच्या कुळातला होता. ४ आणि नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे असें दावीदानें रानात ऐकलें. ५ मग दावीदानें दहा तरुणास पाठवले आणि दावीद त्या तरुणास म्हणाला, कर्मेल येथे जा व व नाबालाकडे जाऊन माझ्या नांवाने त्याला सलाम करा. ६ आणि त्या सुखी जिवाला असें म्हणा, तुला शांती असो.व तुझ्या घराला शांति असो,आणि जे कांही तुझे आहेत्या अवघ्याला शांति असो. ७ तुझ्याकडे कातरणारे आहेत असें मीं आतां ऐकलें. आतांच तुझे मेंढके आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही, आणि जितके दिवसते कर्मेलात होते तितके हिवस त्यांचे कांही हरवले नाही. ८ तूं आपल्या तरुणांस विचार,म्हणजे ते तुला सांगतिल; तर या तरुणांवर तुझी कीदृष्टी व्हावी , कारम आम्ही चांगल्या दिवशी आलों; ९ मी तुला विनंती करतों, जें कांहीं तुझ्या हाताझी येईल तें तूं तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नांवानें नाबालाशी बोलून उगेच राहिले. १० तेव्हां नाबालाच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटलें, दावीद कोम आहे? इशायाचा मुलगा कोण? जे एकेक आपापल्या धन्यापासून सुचून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसांत आहेत. ११ माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांसजें मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यासाठीं तयार केलें तें घेऊन, जी माणसें कोठून आली आहेत हें माला माहित नाहीं अशांना मी द्यावें काय? १२ मग दावीदाचे तरुण आपल्या वाटेनें परत गेले, आणि माघारे येऊन त्यांनी ह्याप्रमाणें सर्व बोलणें त्याला सांगितलें. १३ तेव्हां दावीद आपल्या माणसांना म्हणाला, तुम्ही आपापली तरवार कंबरेस बांधा. मग प्रत्येकाने आपापली तरवार कंबरेस बांधली, दावीदानेंहि आपली तरवार कंबरेस बांधली, आणि दावीदाच्यामागें सुमारें चारशें मनुष्यें वर गेली, आणि दोनशें मनुष्यें सामानाजवळ राहिली. १४ आणि नाबालाची बायको अबीगईल हिला चाकरातींल एकानें सांगितलें, पाहा, दावीदानें रानातून आमच्या धन्याला सलाम सांगाबला दूत पाठवले, परंतु तो त्यांच्या अंगावर गेला. १५ पण ती मनुष्यें आम्हांशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हाला कांही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानांत त्याच्याबरोबर वागलो तितके दिवस आमचे कांही हरवले नाही. १६ आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होतीं. १७ तर आतां तूं काय करणार हें समजून विचार कर, कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचें ठरलें आहे; कारण त्याच्याशीं कोणाच्यानें बोलवत नाही एवढा तो वाईट आहे. १८ आणि अबीगईलेनें घाई करून दोनशें भाकरी व द्राक्षारसाचे दोन घडभुधले व पांच तय़ार केलेलीं मेंढरे व पांच मापें हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अजिराच्या दोनशें ढेपा हीं घेतली वगांढवावर घातलीं. १९ आणि तिनें आपल्या चाकरांना म्हटलें, माझ्यापुढें चला,पाहा, मी तुमच्यामागून येतें, परंतु तिनें आपला नवरा नाबाल याला कांही सांगितलें नाही. २० आणि असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेनें जात असतां पाहा, दावीद व त्याची माणसें तिच्याकडे येत होती आणि त्यांना ती भेटली. २१ आणि दावीदानें म्हटलें होतें की, रानात त्यांचे जे होते त्या सर्वातलें हरवले नाही, असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेलें; आणि माझ्याशीं बऱ्याचे वाईट परत केले आहे. २२ जें कांही त्याचें आहे त्या सर्वातून एकहि मुलगा जर मी सकाळ उजाडेपर्यत राहू दिला तर तसें वत्यापेक्षां अधिकहि देव दावीदाला करो. २३ आणि अबीगईलेनें दावीदाला पाहिलें तेव्हां ती लवकर गाढवावरूम उतरली, आणि दावीदापुढें उपडें पडून तिनें भूमीकडे नमन केले, २४ आणि तिनें त्याच्या पायां पडून म्हटले, माझ्या र्रभू, अन्याय माझ्याकडे, माझ्याकडेच असावा, आणि मी तुला विनंती करतें, तुझ्या दासीला तुझ्या कानीं बोलूं दे, आणि तूं आपल्या दासीचे शब्द ऐक. २५ मी तुला विनंती करते,माझ्या प्रभूनें या वाईट माणसाला, नाबालालाल, मानूं नये,कारण जसेत्याचे नाव तसातो आहे, त्याचें नांव नाबाल (म्हणजे मूर्ख)असें आहे, आणि त्याच्याठायी मूर्खपण आहे;परंतु माझ्या प्रऊचे तरुण मनुष्य,जे तूं पाठवले, त्यांना मी तुझ्या दासीनें पाहिलें नाही. २६ तर आतां माझ्या प्रभू, यहोवा जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे, आणि रक्त पाडण्याच्या जोषापासून व आपल्या हातानें सूड घेण्यापासून यहोवानें तुला आवरलें आहे. तर आतां जे तुझे शत्रू व जे माझ्या प्रभूचें वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत. २७ आणि आतां ही जी भेट तुझ्या जासीनें माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी. २८ मी तुला विनंती करतें, तू आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा कर; कारण माझा प्रभु यहोवाच्या लढाया लढतो, आणि तुझ्याठाय़ी तुझ्या सर्व दिवसांत वाईट सांपडणार नाही; म्हणून यहोवा माझ्या प्रभूचें घर खरोखर स्थिर करील. २९ आणि जरी मनुष्य उठून तुझ्या पाठीस लागला व तुझा जीव घ्यायला पाहत असला तरी माझ्या प्रभूचा जीव यहोवा तुझा देव याच्याजवळ जिवाच्या गांठोड्यात बांधलेला राहील, आणइ, जसे गोफणीच्या खोलग्यातून फेकतात तसे तुझ्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल. ३० आणि असें होईल की, यहोवानें तुझ्याविषयी जें चांगले सांगितलें आहे ते सर्व तो माझ्या प्रभूचें करून तुला इस्त्राएलाचा अधिकारी नेमील, ३१ तेव्हां माझ्या प्रभूनें विनाकारण रक्त पाडलें व सूड घेतला ह्याबद्दल खेद तुला होणार नाही, किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाहीं. आणि यहोवा माझ्या प्रभूचें बरें करील तेव्हां तूं आपल्या दासीचें स्मरण कर. ३२ तेव्हां दावीद अबीगईलेला म्हणाला, यहोवा, इस्त्राएलाचा देव, ज्यानें तुला आज मला भेटायला पाठवलें, तो धन्यव्दित असो. ३३ आणि तुझा बोध आशीर्वादित होवो; आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हातानें सूड घेण्यापासून मला जिनें अजवलें ती तूं आशीर्वादित हो. ३४ कारण तुझे वाईट मी करणार होतों तें ज्यानेंमला करूं दिलें नाहीं तो यहोवा, इस्त्राएलाचा देव जिवंत आहे; जर तूं मला भेटायला लवकर आली नसरीस तर खचित नाबालाचा एक मुलगा देखील सकाळ उजाडेपर्यत राहिला नसता. ३५ मग जें तिनें दादीदासाठीं आणले होतें ते त्यानें तिच्या हातबन घेतलें वतिला म्हटले, तूं आपल्या घरीं शांतीनें जा, पाहा, मीं तुझी वाणी एकली आहे आणि तुला मान्य केलें आहे. ३६ मग अबगईल नाबालाकडे आली, आणि पाहा, त्यानें आपल्या घरीं राजाच्या मेजवाणीसारखी माजवाणी केली आहे. तेव्हां नाबालाचें ह्रदय त्याच्या आंत संतुष्ट होतें, कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता,म्हणून तिनें पहाट उजाडेपर्यत त्याला अधिक उणें कांहीच सांगितले नाही. ३७ आणि असें झाले का, सकाळी नाबालाचा कैफ उतरळ्यावर त्याच्या बायकोनों या गोष्टी त्याला सांगितल्या तेव्हां त्याचे ह्रदय त्याच्या आंत मेलें व तो दगडासारखा झाला. ३८ आणि असें झाले की सुमारें दहा दिवसानंतर यहोवाने नाबालाला मारलें व तो मेला. ३९ आणि नाबाल मेला असें दावीदानें ऐकले तेव्हां तो म्हणाला, ज्यानें माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्यानें आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरलें, तो यहोवा धन्यवाद्त असो. यहोवाने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे. मग दावीदानें अबीगईलेकडे येदूत पाठवून तिला आपली बायको करण्याविषयीची गोष्ट काठली. ४० आणि दावीदाते चाकर कर्मलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले,दावीदानें, तूं त्याची बायको व्हावें म्हणून आम्हांला तपझ्याकडे पाठवले आहे. ४१ तेव्हां ती उठूनन भूमीकडे लवून नमली व म्हणाली, पाहा, तुझी दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण असावी. ४२ मग अबीगईल घाई करून उठली, व गाढवावरबसून निघाली, आणि तिच्या पांच सख्या तिच्मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या दूतांच्यामागून गेली, आणि त्याची बायको झाली. ४३ आणि दावीदानें इज्रेलकरीण अहीनवाम हिलाहि बायको करून घेतलें; त्या दोघीहि त्याच्या बायका झाल्या. ४४ शौलानें तर आपली मुलगी मीखल,दावीदाची बायको,गल्लीमांतील लइशाचा मुलगा पालती याला दिली होती.