२७
१ आणि दावीद आपल्या मनांत म्हणाला, कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावें यापेक्षा मला दुसरें कांहीं बरें दिसत नाही; मग शौल इस्त्राएललाच्या अवघ्या प्रांतांत आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल, आणि मी त्याच्या हातातून सुटेन. २ मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली शहाशें माणसें अशी ती मवोखाचा मुलगा अखीश, हथाचा राजा याच्याकडे गेली, ३ तेव्हां दावीद व त्याची लर्व माणसे एकेक आपल्या कूबासुध्दां गथांत आखीशाजवळ राहिली; दावीदाबरोबर त्याच्या दोघी बाबका, ईज्रलीण अहीनवाम व पूर्वी नाबालाची बायको होती ती कर्मेलीण अबीगईल ह्या होत्या. ४ आणि दावीद गथास पळून गेला असें कोणी शौलाला सांगितलें, मग त्यानें त्याचा शोध आणखी केला नाही. ५ आणि दावीद आखीशाला म्हणाला, तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणाएका नगरांत मी तेथे राहावें म्हणून मला जागा दे; तुझ्या दासानें राजधानीत तुझ्याजवळ कां राहावे? ६ तेव्हां आखीशाने त्याला सिकवाग दिले. यामुळे सिकलाग आजपर्यत यहूदाच्या राडांकडे आहे. ७ आणि दावीद पलिष्टायाच्या मुलखात राबिला ते दिवस एक पूर्ण वर्ष व चार महिने इतके होते. ८ आणि दावीद व त्याचीं माणसें यांनी वर जाऊन गशूरी व गिजरीव अमालेकी यांच्यांव घाला घातला, कारण ते लोक पूर्वीपासून, तूं शूरास व मिशर देशास जात असतोस त्या वाटेवरल्या प्रांतात राहणारे होते. ९ आणि दावीदानें त्या प्रांतातला मारले,आणि पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवलें नाही; मग मेंढरेव गुरे व गाढवे व उंटव वस्त्रें ही घेऊन तो आखीशाकडे परत आला. १० तेव्हां आखीश म्हणाला, आज तूं कोणावर घाला घातलास? दावीद म्हणाला,यहूदाच्या दक्षिण प्रदेशावर व यरहमेली यांच्या दक्षिण प्रदेशावर व केनी यांच्या दक्षिण प्रदेशावर. ११ आणि दावीदानें गथाकडे वर्तमान आणायला पुरुष किंवा स्त्री जुवंत ठेवली नाहि. त्याने म्हठले, त्यांना जिंत ठेवलें तर ते आम्हाविषयी सांगतील व म्हणतील की, दावादाने असे असें केले आहे, आणि तो पलिष्ट्यांच्या मुलखांत राहिला तेव्हापासून त्याची चाल अशीच दोती. १२ आणि आखीशाने दावीदावर भरवसा ठेवून म्हठले, त्यानें आपल्या इस्त्राएली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतलें आहे, म्हणून तो सर्वकाल माझा चाकर होईल.