१ नंतर इस्त्राएलाच्या संतानानी परमेश्वराच्या दृष्टींत वाईट केलें, यास्तव परमेश्वरानें तीं मिद्दानाच्या हातीं सात वर्षे दिलीं. २ तेव्हा मिद्दानाचा हात इस्त्राएलावर प्रबळ पडता झाला; डोंगरांत जीं विवरें व गुहा व गड आहेत, ते मिद्दान्यांमुळें इस्त्राएलाच्या संतानानी आपल्यासाठीं केले होते. ३ तेव्हां असें झालें कीं जर इस्त्राएलानी पेरिलें, तर मिद्दान्यानी व अमालेकानी चढून यावें, आणि पूर्वेकडल्या संतानानीहि त्यांवर चढून यावें. ४ असा त्यानीं त्यांवर तळ धरून गाज्ज्यांत जाईस तोंपर्यंत भूमीचें उत्पन्न नासिलें, आणि इस्त्राएलांत काहीं खाणें किंवा बकरें किंवा बैल किंवा गाढव असा कांहीं जीव ठेविला नाहीं. ५ कां तर ते संख्येकरून टोळांसारिखे आपले पशू व आपल्या राहोट्या यासुध्दां आले, आणि त्यांची व त्यांच्या उंटांची गणती नव्हती; असे ते देशाचा नाश करायास आले होते. ६ तेव्हां मिद्दान्यांकडून इस्त्राएल फार दरिद्री झाले, आणि इस्त्राएलाच्या संतानानी परमेश्वराची काकळूत केली. ७ तर जेव्हां इस्त्राएलाच्या संतानानी मिद्दान्यांमुळें परमेश्वराची काकळून केली, तेव्हां असें झालें, ८ कीं परमेश्वराने कोणी भविष्यवादी इस्त्राएलाच्या संतानांजवळ पाठविला; तेव्हां तो त्यांस बोलला, “इस्त्राएलाचा देव परमेश्वर असें म्हणतो, म्या तुम्हास मिसरांतून आणिलें, दास्याच्या वस्तींतून देखील तुम्हास काढीलें; ९ असें म्या तुम्हास मिस-यांच्या हातांतून व तुमच्या सर्व वाचणा-यांच्या हातांतून सोडविलें; आणि त्यांस तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हास दिल्हा. १० तेव्हा म्या तुम्हास असे सांगितलें की मी तुमचा देव परमेश्वर आहें; ज्या आमो-यांच्या देशांत तुम्ही राहत आहां, त्यांच्या देशांस तुम्ही भिऊं नका; तरी तुम्ही माझी आज्ञा मानिली नाहीं '' ११ अणखी परमेश्वराचा दूत येऊन म्हणी एजी योवाश याच्या अफू-यात जें एला झाड त्याखालीं. बसला; तेव्हां त्याचा पुत्र गिदोन गहूं मिद्दान्यांपासून राखायाक तेथें घाण्यांत मळीत होता. १२ आणि परमेश्वराचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला बोलला, “हे पराक्रमी, वीरा, परमेश्वर तुला अनुकूळ आहे.'' १३ तेव्हां गिदोन त्याला बोलला, ''हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आम्हास कां प्राप्त झालें? आणि त्याचे सर्व चमत्कार कोठे आहेत? का आमच्या पूर्वजानी ते आम्हाजवळ वर्णितांना सांगितले होते, 'परमेश्वराने आम्हास मिसरांतून आणिलें नाहीं कीं काय ?' आतां तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हास मिद्दान्यांच्या हातीं दिल्हें आहे.'' १४ मग परमेश्वराने त्यावर दृष्टी लावून म्हटलें, ''तूं आपल्या या बळाले जा, आणि इस्त्राएलास मिद्दान्यांच्या हातांतून तार; मी तुला पाठवीत नाहीं कीं काय?' १५ तेव्हां हा त्याला बोलला, ''हे माझ्या प्रभू, मी इस्त्राएलाला कसा तांरू? पाहा, मनाश्श्यांत माझें कूळ धाकटें आहे, आणि मा आपल्या बापाच्या घरांत लाहान आहें.'' १६ तेव्हां परमेश्वर त्याला बोलला, ''असो, परंतु मी तुला अनुकूळ होईन, आणि तूं मिद्दान्यांला एका मनुष्यासारिखा मारसील.'' १७ तेव्हा हा त्याला बोलला, ''आतां तुझ्या लक्षांत जर मला कृपा मिळली आहे, तर तूं मला खूण करून दे कीं तूंच मजसीं बोलत आहेस. १८ आतां, मी तुझ्याजवळ येतों तोपर्यंत तूं एथून जाऊं नको; म्हणजें मी आपलें दान आणून तुझ्यापूढें ठेवींन.'' तेव्हां तो बोलला, ''तूं माघारा येसील तोंपर्यंत मी राहीन.'' १९ तेव्हां गिदोनार्ने जाऊन शेळ्यांतलें करडूं व पांच पायली पिठाच्या बेखमीर भाकरी सिध्द केल्या; त्याने सागोती टोपलींत घातली, आणि कालवण पातेलींत घातलें, मग त्याच्याजवळ एला झाडाखालीं नेऊन सादर केलें. २० तेव्हा देवाच्या दूताने त्याला सांगितलें, ''तूं सागोती व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि कालवण ओत.'' मग त्याने तसें केलें. २१ तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातांतल्या काठीचा अग्रभाग सागोतीला व बेखमीर भाकरीला लाविला; मग खडकांतून अग्नि निघाला, आणि त्या अग्नीने सागोती व बेखमीर भाकरी जाळून टाकल्या; परमेश्वराचा दूतहि त्याच्या दृष्टींतून गेला. २२ तेव्हां गिदोनाने पाहिलें कीं तो परमेश्वराचा दूत होता; मग गिदोन बोलला, ''हें प्रभू परमेश्वरा, हाय हाय; कारण कीं म्या परमेश्वराचा दूत तोंडोतोंड पाहिला आहे. २३ तेंव्हा परमेश्वर त्याला बोलला, ''तूं सुखी ऐस, भिऊं नको, मरणार नाहींस.'' २४ तेव्हां गिद्दोनाने तेथें परमेश्वरासाठीं वेदी बांधिली, आणि त्याचें नांव ''परमेश्वर प्रसन्न, असें ठेंविलें; ती सांप्रत आजपर्यंत अबीएज-याच्या अफ-यात आहे. २५ आणि असें झालें कीं, त्याच रात्रीं परमेश्वराने त्याला सांगितलें कीं, ''तुझ्या बापाचीं जीं गुरें त्यांतला गो-हा, म्हणजे सात वर्षाचा दुसरा गो-हा, तो तूं घे, आणि बाल देवासाठी तुझ्या बापाची जी वेदी, ती मोडून टाक, आणि तिच्याजवळ जें भजनवन तें कापून टाक. २६ मग या खडकावर नेमित प्रकारे आपला देव परमेश्वर यासाठीं वेदी बांधून आणि तो दुसरा गो-हा घेऊन, जें भजनवन तोडसील, त्याच्या लांकडानी होम कर.'' २७ तेव्हां गिदोनाने आपल्या चाकरांतलीं दाहा माणसें घेऊन, जसें परमेश्वराने त्याला सांगितलें होतें, तसें केलें; परंतु असें झालें कीं दिवस असतां तें करायाला तो आपल्या बापाच्या घराण्याला व त्या नगरच्या माणसांस भ्याला, यास्तव रात्रीं त्याने केलें. २८ मग सकाळीं त्या नगरचीं माणसें उठलीं, तर पाहा, बालाची वेदी मोडलेली होती, तिच्याजवळचें भजनवनहि तोडलेलें होतें, आणि बांधलेल्या वेदीवर दुस-या गो-हाचा होम केलेला होता. २९ तेव्हां तीं एकमेकासीं बोललीं, ''ही गोष्ट कोणी केली?'' मग त्यानीं विचार व शोध केल्यावर म्हटलें, ''योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.'' ३० नंतर त्या नगरच्या माणसानीं योवाशाला सांगितलें, ''तूं आपला पुत्र बाहेर आण, त्याला तर मारायाचें आहे, कारण कीं त्याने बालाची वेदी मोडून टाकिली, अणखी तिच्याजवळचें भदनवन तोंडून टाकिलें आहे.'' ३१ तेव्हां योवाश आपणावर जे उठलेले होते, त्या सर्वांस तो बोलला, ''बालासाठीं तुम्ही वाद करितां कीं काय? तुझी त्याचा पक्ष धरितां कीं काय? जो त्याच्यासाठीं वाद करील तो आतांच्या सकाळीं इतक्यांत मारला जावो; जर तो देव आहे, तर त्यानेच आपल्यासाठीं वाद करावा कीं त्याची वेदी याने मोंडून टाकिली.'' ३२ तेव्हां त्याच दिवसीं त्याने त्याला यरूब्बाल म्हटलें, कारण कीं तो बोलला होता, ''बालानेच आपल्यासाठीं वाद करावा कीं त्याची वेदी याने मोडून टाकिली. ३३ तेव्हां सर्व मिद्दानी व अमालेकी व पूर्वेकडल्या प्रजा एकत्र मिळाल्या, आणि त्यानी अलिकडे येऊन इस्त्रएल खिंडींत तळ धरिला. ३४ नंतर परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाला प्रेरिलें; यास्तव त्याने शिंग वाजविलें, तेव्हां अबियेजेराचे लोक त्याच्याजवळ एकत्र मिळाले. ३५ मग त्याने सगळ्या मनाश्श्यांत बासुद पाठविले, तेव्हां। तेहि त्याच्याजवळ एकत्र मिळाले; नंतर आशेरांत व जबूलुनांत व नाफताल्यांत त्याने जासुद पाठविले, तेव्हां ते यांसीं मिळायास चढून गेले. ३६ मग गिदोन देवास बोलला, ''जसें त्या सांगितलें, तसा जर तूं माझ्या हाताने इस्त्राएलाला तारणार आहेस; ३७ तर पाहा, मी खळ्यांत लोहकरीचा झुपका ठेवितों; जर झुपक्यावर मात्र दहिंवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल कीं जसें त्या सांगितलें, तसा तूं माझ्या हाताने इस्त्राएलाला तारसील.'' ३८ नंतर तसें झालें; म्हणजे सकाळीं जेव्हां तो उठला, तेव्हां त्याने तें झुपक्यास दुमडलें, आणि कात्रणांतून दहिंवर पिळून वाटीभर पाणी काढिलें. ३९ मग गिदोन देवाला बोलला, ''तूं मजवर रांगें भरूं नको, म्हणजे मी या वेळेस मात्र बोलतों; आतां केंवळ या वेळेस झुपक्याने तुझें सत्व पाहतों; कृपेने झुपक्याला मात्र कोरडेपण होवो, आणि संपूर्ण भूमीवर दहिंवर होवो.'' ४० तेव्हा त्या रात्रीं देवाने तसें केलें कीं झुपक्याला मात्र कोरडेपण झालें, आणि संपूर्ण भूमीवर दहिंवर झालें.