१ यरीहोचा पाडाव (इस्राएल लोकांच्या भीतीमुळें यरुहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यांत आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाहीं की आत आला नाही.) २ परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पाहा, यरीहो, त्याच्या राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. ३ तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोयहोंवती एक प्रदेक्षिणा घाला. असें सहा दिवस करा. ४ सात याजकांनी सात रणाशिगें घेऊन कोशापुढें चालावे; सातव्या दिवशीं तुम्हीं नगरला सात प्रदेक्षिणा घालाव्या आणि याजकानी रणशिगें फुंकलीं जात असताना त्याच्या दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, ५ म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्यकानें सरळ आत चलून जावें. ६ नंतर नुनाचा मुलगा यहोशवा ह्यानें याजकांना बोलावून म्हटलें, कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजक सात रणशिंगें घेऊन परमेश्वराच्या कोशापूढ़े चाला. ७ तो लोकांना म्हणाला, चला, नगरला प्रदेक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुष परमेश्वराच्या कोशापुढ़ें चाला. ८ यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणें सात याजक परमेश्वरापुढें सात रणशिंगें फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. ९ सशस्त्र लोक रणशिंगें वाजविणाऱ्या याजकापुढें चालत होते आणि रणशिंगें वाजत असतांना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. १० मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की, मी तुम्हांला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊं देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटें चकार शब्द काढूं नका ; आज्ञा होतांच जयघोष करा. ११ ह्या प्रकारें परमेश्वराच्या कोशाची नागरासभोंवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथें रात्री मुक्काम केला. १२ यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराच्या कोश उचलून घेतला. १३ सात याजक रणशिंगें घेऊन परमेश्वराच्या कोशापुढें ती एकसारखी फुंकीत निघाले आणी सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; रणशिंगें फुंकीली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागें चालत होते. १४ ते दुसऱ्या दिवशीहि नगराला एक प्रदेक्षिणा घालून छावणीत परत आले; असें त्यांनी सहा दिवस केले. १५ सातवा दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारें त्या नगरला सात प्रदेक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगरला सात प्रदेक्षिणा घातल्या. १६ सातव्या वेळी याजक रणशिंगें फुंकीत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, जय घोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे ; १७ हे नगर व ह्यांत जें काही असेल तें सर्व परमेश्वराला समर्पित करावे ; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तीच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावें, कारण आपण पाठविलेल्या जासुदांना तिनें लपवून ठेवलें होतें. १८ तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटांत घालाल. १९ पण सर्व सोनें, रूपें आणि तांब्याची व लोखंडाचीं पात्रें परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत. २० तेव्हां लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगें वाजत राहिलीं रणशिंगांचा आवाज ऐकतांच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्याजागी कोसळला ; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन तें हस्तगत केलें. २१ त्या नगरांतील पुरूष स्त्रिया, तरूण, वृध्द, गुरेंमेंढरें, गाढवें वगैरे सर्वाचा त्यांनी तलवारींने समूळ नाश केला. २२ तेव्हां जे दोन पुरूष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. २३ तेव्हां त्या तरूण हेरांनीं आतं जाऊन राहाबेला, तिच्या आईबापांना, भाऊबंदांना, तिचे दे कोणी होते त्या सर्वाना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्त्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवलें. २४ मग त्यांनी तें नगर व त्यांतले सर्व काही आग लावून जाळले; मात्र सोनें, रूपें आणि तांब्याची व लोखंडाची पात्रें हीं त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारांत ठेवलीं. २५ यहोशवानें राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वांचविले; तिचा वंश आजपर्यत इस्त्राएल लोकांमध्ये वसत आहे; कारण जे जासूद यरीहो हेरावयाला यहोशवानें पाठविले होते, त्यांना तिनें लपवून ठेवलें होतें. २६ त्या समयीं यहोशवानें असा शाप दिला कीं, जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालतांच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारतांच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. २७ ह्याप्रमाणें परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ति सर्व देशभर पसरली,