१३
१ मग यहोशवा वयाने वृद्ध झाला, तेव्हा परमेश्वर त्याला बोलला, “तूं वयाने वृद्ध झालास, तथापि वतन करून घ्यायाचा देस बहुतच राहिला आहे. २ जो देश राहिला तो हाच, सामुन्द्रवळणांकडला पलीष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि गशुरी सर्व प्रांत; ३ मिसराच्या पूर्वस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जें एक्रोनं त्याच्या सीमेपर्यंतहि जो देश, तो खनान्यांचा मोजलेला आहे; गाज्जथी व आशदोदी, एष्कलोनी, गित्ती व एक्रोनी व भाव्वी यांचे पलिष्टी पॅाच सूभेदार आहेत. ४ दक्षिणेस खनान्यांचा सर्व देश, आणि सिदोन्यांचें जें म्यारा तें, अफेकापर्यंत म्हणजे आमोऱ्यांच्या सीमेपर्यंत तो देश ; ५ आणि गीबली यांचा देश, व सूर्याच्या उग्व्तेस सर्व लबानोन, हेर्मोन डोंगराखालच्या बालगादापासून ह्माथांत जायाच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायाचा आहे; ६ लबानोनापासून मिस्त्रफोथमाइमापार्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सिदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानांपुढून वातनांतून घालविन; त्याचां देश इस्राएलाच वतन तू देवखुणा मात्र करून पाड. ७ तर आता नऊ वंश व अर्धा मनाश्शे याचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वांटण्या कर. ८ त्याच्या संगतींचा अर्धा वंश व रऊबेनी व गादी हे आपलें वतन पावले; कां कीं मोश्याने यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस त्यंस दिल्हे आहे; परमेश्र्वीरचा सेवक मोशे याने त्यंस जसें दिल्हें तसें असो. ९ आर्णोंन नदीच्या कांठीं जें भरवेर, म्हणजे त्या खिडिच्या मध्यभागीं ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व सपाटीहि; १० आणि आमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेश्बोनांत राज्य केलें त्याचीं, आम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरें; ११ गीलादहि, आणि ग्शुरी व माखाथी यांची सीमा, आणि अवघा हेर्मोन डोंगर, व साल्खापर्यंत सर्व वाशान; १२ म्हणजे वाशानांतल्या ओगाचें सर्व राज्य दिल्हे; त्याने आष्टारोथ व एद्रेई यांत राज्य केलें; रफाई यांच्या शेषांतला तो राहिला होता, परंतु मोश्याने त्यांस मारून चे वतन घेतलें.” १३ तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथ आर्पर्यंत इस्राएलामध्यें राहत आहेत. १४ लेविच्या वंशाला मात्र त्याने वतन दिल्हें नाहीं; इस्राएलाच्या देव परमेश्र्वर याचीं जीं जळायाचीं अर्पणें, तेच त्याचें वतन आहे; जसें त्याने त्याला सांगितलें तसें. १५ परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे मोश्याने दिल्हें. १६ आणि त्याच्या सीमा असी प्राप्त झाली कीं आणोंन नदीच्या कांठावर जें अरवेर, म्हणजे त्या खिंडीच्या मध्यभागीं जे नगर, तेथून मेदब्याजवळचीं सर्व सपाटीही; १७ हेशबोन आणि सपाटीवर त्याकडलीं जीं सर्व नगरें; दिबोन व खामोथबल व बेथबालमोन; १८ आणि याहजा व कदेमोथ मेफाथ; १९ आणि किर्याथाईम व सिब्मा व खिंडीच्या डोंगरावरचें सरेथ शहर; २० आणि पिरवस्ती व पिसग्याचे उभड व बेथयशीमोथ; २१ आणि सपाटीतलीं सर्व नगरे ; म्हणजे अमोऱ्याचा राजा सिहोन त्याचें सर्व राज्य त्यत होतें; त्याने हेशवोनांत राज्य केलें ; त्याला मोश्याने मारिलें, आणि देशांत राहणारे सिहोनाकडून अभिषेकलेले मिद्दानावरले अधिकारी अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहि मारिलें; २२ आणि त्यच्या मारलेल्यांसंगतीं तो जादूगीर खोराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तरवारीने जीवें मारिलें. २३ तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन व थडप्रांत असी झाली; रुऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणें त्यांचें हेंच वतन, ती नगरें व त्यांच्या खालचे गांव. २४ गादाच्या वंशालाहि, गादीच्या संतानांस त्यांच्या कुळाप्रमाणें मोश्याने वतन दिल्हें. २५ आणि त्यांची सीमा याजेर व गीलादांतलीं सर्व नगरें व आम्मोनाच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढें जें अरवेर तेथपर्यंत झाली. २६ आणि हेश्बोनापासून मिजपे यांतला राम तेथपर्यंत, आणि बटोनीमा व माह्नाइमापासुन द्बिराच्या सीमेपर्यंत; २७ आणि खोऱ्यातले बेथहाराम व खेथनिस्त्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशुबोनाचा राजा सिहोन याच्या राज्याचें शेष यार्देन व त्याची थड कित्रेरेथ समुद्रांच्या कांठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले. २८ गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणें त्याचें वतन हेंच, तीं नगरें व त्यांच्या खालचे गांव. २९ आणि मनाश्श्याच्या अर्ध्या वंशाला मोश्याने वतन दिल्हें; तर मनाश्श्याच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुलाप्रमाणें असें झालें; ३० कीं त्यांची सीमा महानाइमापासून सर्व बाशान, म्हणजे खाशानाचा राजा आगे याचें अवघें राज्य, बाशानांतले याईरचे जे अवघे गांव साठ नगरें त्यांसुद्धा; ३१ आणि अर्धा गिलाद, आणि बाशानांत ओगाच्या राज्यांतलीं नगरें आष्टारोथ व एद्रेई यांसुद्धांही; असें मनाश्श्याच्या पुत्र माखीर यांच्या संतानांस, म्हणजे माखीराच्याअर्ध्या संतानांसत्यंच्या कुलांप्रमाणे प्राप्त झालें. ३२ यारीहोजवल यार्देन इच्या पलिकडे पूर्वेस मोबाबिच्या अरण्यांत मोश्याने जी वतनें दिल्हीं तीं हींच. ३३ लेविच्या वंशाला तर मोश्याने वतन दिल्हें नाहीं; इस्राएलचा देव परमेश्र्वर याने जसें त्यांस सानितलें, तसा तोच त्यांचे वतन आहे.