१०
१ आणि अबीमेलेखाच्यामागें इस्त्राएलाच्या संरक्षणासाठीं दोदोचा पुत्र पूवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारांतला माणूस तो उत्पन्न झाला, आणि तो एफ्राइम डोंगरावरल्या शामीरांत राहिला. २ त्याने तेवीस वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीरांत पुरला गेला. ३ नंतर त्याच्यामागें गिलादी पाईर उत्पन्न झाला, आणि त्याने बावीस वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला. ४ तेव्हां त्याला तीस पुत्र झाले; तीस गाढवांवर ते बसत होते; त्यांस तीस नगरेंहि होती; आजपर्यंत त्यांस हावोथयाईर म्हणतात; तीं गिलादाच्या प्रांतांत आहेत. ५ मग याईर मेला, आणि कामोनांत पुरला गेला. ६ यानंतर इस्त्राएलाच्या संतानानी फिरून परमेश्वराच्या दिसण्यांत वाईट केलें; कारण कीं त्यानी खालीम व आष्टारोथ व अरामांतले देव व जीदोनांतले देव व मोवाबांतले देव व आम्मोनी लोकांचे देव व पलिष्टयांचे देव, याची सेवा केली; त्यानी परमेश्वराला टाकिलें, त्याची सेवा केलीच नाहीं. ७ यास्तव परमेश्वराचा राग इस्त्राएलावर पेटला, आणि त्याने त्यांस पलिष्टयांच्या हातीं व आम्मोनी लोकांच्या हातीं दिल्हें. ८ तेव्हा त्या वर्षासुध्दा अठरा वर्षे त्यानी इस्त्राएलाच्या संतानें यार्देनेच्या पलिकडे अमो-यांच्या देशाजवळ गिलादांत होतीं त्या सर्वास. ९ यहूदा व खन्यामीनन व एफ्राइमाचीं घराणें यांसींहि लढायास आम्मोनी लोक यार्देनेच्या अलिकडे आले; असी इस्त्राएलाला फार पीडा झाली. १० तेव्हा इस्त्राएलाच्या संतानानी परमेश्वराला हाक मारीत म्हटलें कीं, ''आम्ही तुझ्याजवळ पाप केलें आहे; तें असें कीं आम्ही आपल्या देवाला टाकून खालीमाची सेवा केली. ११ तेव्हा परमेश्वराने इस्त्राएलाच्या संतानांस म्हटलें. ''मिस-यांपासून व अमो-यांपासून व आम्मोनी लोकांपासून म्या तुम्हास तारिलें कीं नाहीं? १२ आणि जीदोनी व अमोलक व यावोन यानी तुम्हास दुःख दिल्हें, तेव्हां तुम्ही मला हाक मारिली, आणि म्या तुम्हास त्यांच्या हातांतून तारिलें. १३ तथापि तुम्ही मला टाकून दुस-या देवांची सेवा केली; यास्तव मी तुम्हास फिरून तारणार नाहीं. १४ तुम्ही जा, आणि ज्या देवांस तुम्ही निवडून घेतलें, त्यांस हाक मारा; तुमच्या दुःखाच्या वेळेस त्यानी तुम्हास तारावें.'' १५ तेव्हां इस्त्राएलाच्या संतानानी परमेश्वराला म्हटलें, ''आम्ही पाप केलें आहें; जें सर्व तुला बरें वाटेल, त्याप्रमाणें तूं आम्हास कर; केवळ आजच्या दिवसीं अगत्य आम्हास सोडीव.'' १६ तेव्हां त्यांनी आपल्यामधून अन्य देवांस दूर करून परमेश्वराची सेवा केली, नंतर तो इस्त्राएलाच्या दु:खामुळे खिन्न झाला. १७ आम्मोनी लोक तर एकत्र मिळाले असतां त्यानी गिलादांत तळ धरिला, आणि इस्त्राएलाच्या संतानानी मिळून मिज्प्यांत तळ धरिला. १८ तेव्हां गिलादान्तल्या सरदार लोकांनी एकमेकाला म्हटलें “जो माणूस आम्मोनी लोकांसी लढाई करायास लागेल, तो कोणीहि असो, तो गीलादांतल्या सर्व राहणाऱ्यांच्या अधिकारी असा व्हावा.”