११
१ त्या वेळेस गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो इफ्ताह वेश्यास्त्रीचा पुत्र, आणि गिलादाच्यापासून जन्मला होता. २ गिलादाची स्त्रिही त्यापासून पुत्र प्रसवली, आणि जेव्हां स्त्रीचे पुत्र वाढले, तेव्हां त्यानी इफ्ताहाला घालवितां म्हटलें, “ आमच्या बापाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण किं तूं दुसऱ्या स्त्रीचा पुत्र आहेस.” ३ यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशांत जाऊन राहिला; तेव्हां रिकामीं माणसें इफ्ताहजवळ मिळून त्याच्यासंगतीं चाललीं. ४ मग कांहीं वेळानंतर असें झालें कीं आम्मोनी लोकांनी इस्त्राएलासीं लढाई केली. ५ आणि आम्मोनी लोक इस्त्राएलासीं लढत असतांनी असें झालें कीं गिलादाचे वडील इफ्ताहाला टोब देशांतून आणायला गेले. ६ तेव्हां त्यानी इफ्ताहाला म्हटलें, “तूं युऊन आमचा सेनापती असा हो, कां कीं आम्ही आम्मोनी लोकांसी लढत आहों.” ७ तेव्हां इफ्ताह गिलादाच्या वडिलांस बोलला, “तुम्ही माझा द्वेष करून माझ्या बापाच्या घरांतून मला घालविलें कीं नाही? तर आतां तुम्ही संकटांत असता, माझ्याजवळ कशाला आलां? ८ तेव्हां गिलादाच्या वडीलानी इफ्ताहाला म्हटलें, “आम्ही आतां तुझ्याकडे यासाठीं फिरलों आहों कीं त्वां आमच्यासंगती येऊन आम्मोनी लोकांसीं लढाई करावी, मग तूं गीलादांतल्या सर्व राहणाऱ्यांवर आमच्या अधिकारी असा होसील.” ९ तेव्हां इफ्ताह गिलादाच्या वडिलांस बोलला, “जर तुम्ही मला आम्मोनी लोकांसी लढायास माघारें नेलें, आणि परमेश्वराने ते माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन कीं काय?” १० तेव्हां गिलादाचे वडील इफताहास बोलले, जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाहीं, तर आपल्यामध्यें परमेश्वर साक्षी होवो.” ११ मग इफताह गिलादाच्या वडिलांसंगतीं गेला, आणि त्या लोकानी आपल्यावर तो अधिकारी व सेनापति असा करून ठेविला; तेव्हां इफताह आपलीं सर्व वचनें मिजप्यांत परमेश्वरापुढें बोलला. १२ मग इफताहाने आम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटलें, “माझें तुझें काय आहे कीं तूं मजसीं लढायास माझ्या देशांत यतोस?” १३ तेव्हा आम्मोनी लोकांचा राजा इफताहाच्या वकिलांस बोलला, “कारण कीं जेव्हां इस्त्राएल मिसरांतून वर आले, तेव्हां त्यानी आर्णोपासून याब्बोकेपर्यंत माझा देश घेतला; तर आता ते प्रांत सुखाने परत दें.” १४ तेव्हां इफताहाने फिरून दुसरे वकील आम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठविले. १५ आणि त्याला म्हटलें, “इफताह असें सांगतो कीं 'इस्त्राएलाने मोवाच देश व आम्मोनी लोकांचा देश घेतला नाहीं. १६ कां तर जेव्हा इस्त्राएल मिसरांतून वर आले, तेव्हां ते सूफ समुद्राजवळच्या रानांत चालून कादेशास आलें. १७ मग इस्त्राएलानी अदामी राजाजवळ वकील पाठवून म्हटलें, तूं कृपेकरून आपल्या देशावरून मला जाऊं दे; परंतु अदोमी राजाने ऐकिलें नाहीं, आणि मोवाबी राजाजवळहि पाठविलें, परंतु तोहि मान्य झाला नाहीं; यास्तव इस्त्राएल कादेशांत राहिले. १८ आणि त्यानी रानांत चालून अदोम देश व मोवाब देश यांस फेरी घालली; असें सूर्याच्या उगवतीकडून मोवाब देशास येऊन आर्णोनेच्या कांठी तळ धरिला; परंतु ते मोवाब सीमेंत गेले नाहींत; कां तर आर्णोन मोवाबाची सीमा आहे. १९ तेव्हां इस्त्राएलानी अमो-यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशूबोनांतल्या राजाजवळ वकील पाठविलें, आणि इस्त्राएलानी त्याला म्हटलें, 'तूं कृपेने आपल्या देशावरून आम्हास आमच्या ठिकाणापर्यत जाऊं दे.' २० तेव्हां सीहोन आपल्या सीमेवरून जाऊं देण्याविषयीं इस्त्राएलाला मान्य झाला नाहीं, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाजांत तळ धरून इस्त्राएलासीं लढाई केली. २१ तेव्हां इस्त्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्त्राएलाच्या हातीं दिल्हे; यास्तव इस्त्राएलानी त्यांस मारिलें, आणि त्या देशांत राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला. २२ असें त्यानी आर्णोनेपासून याब्बोकेपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमो-यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले. २३ तर आतां इस्त्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्त्राएल यांपुढे अमो-यांस घालविलें; तर तो प्रांत तूं घेतोस काय? २४ तुझा देव कमोश तुला जें वतन देतो, तें तूं ठेवसील कीं नाहीं? तसें आमचा देव परमेश्वर जें वतन आमच्यापुढें ठेवुन देतो, तें आम्ही ठेवूं. २५ तर आता जिण्णोराचा पुत्र मोवाब राजा यापेक्षां तूं बरा आहेस कीं काय? इस्त्राएलासीं तो कधी भांडिला कीं काय? त्याने त्यासीं कधी लढाई केली कीं काय? २६ जेव्हा इस्त्राएल हेशबोनांत व त्याच्या गावांत, आणि अरवेरांत व त्याच्या गावांत, आणि आर्णोनेच्या काठावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिला, त्या वेळेस तर तुम्ही कां काढुन घेतलीं नाहींत. २७ म्या तर तुझा अपराध केला नाहीं, परंतु तूं मजसीं लढण्याने माझें वाईट करितोस; परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्त्राएली लोक व आम्मोनी लोक यांमध्यें न्याय करो.” २८ तथापि आम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफताहाने जीं वचनें पाठविलीं तीं ऐकिलीं नाहींत. २९ तेव्हां परमेश्वराचा आत्मा इफ्ताहाला प्राप्त झाला, नंतर गिलाद व मनाश्शे यांत तो चहुंकडे गेला, आणि गिलदार तेल मिजपे त्यांत चहुंकडे गेला, मग गिलादान्तले मिज्पे सोडून आम्मोनी लोकाकंडे गेला. ३० आणि इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करितां म्हटलें “जर तूं माझ्या हातीं आम्मोनी लोक देसिलच देसील, ३१ तर असे होईल कीं मी आम्मोनी लोकांपासून सुखरूप माघारा आलों तेव्हां मला भेटायाला जें काहीं माझ्या घराच्या दारांबाहेर येईल, तें तर परमेश्वराचें होईल, अथवा मी त्याचें होमरूपें अर्पण करीन.” ३२ तर इफताह आम्मोनी लोकांसीं लढायाला त्यांकडे गेला, आणि परमेश्वराने ते त्याच्या हातीं दिल्हे. ३३ आणि अरबेरापासून मिन्नीथाजवळ येण्यापर्यंत त्यांस मारून वीस नगरें घेतलीं, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेलापर्यंत फार मोठा मार दिल्हा; असे आम्मोनी लोक इस्त्राएलाच्या संतानाच्या स्वाधीन झाले. ३४ मग इफताह मिजप्यांत आपल्या घरास आला; तेव्हां पाहा, त्याची कन्या त्याला भेटायाला डफानी व ताफ्यानी बाहेर आली; ती तर त्याची एकुलती होती; तिजशिजाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती. ३५ तेव्हां असें झालें कीं त्याने तिला पाहतांच आपलीं वस्त्रें फाडून म्हटलें, “अहहा, माझ्या कन्ये! त्वां मला अगदी पाडिलें आहें; मला दुःख देणारे यांत तूंहि आहेस; कां म्या आपलें तोंड परमेश्वराजवळ उघडिलें आहें; यास्तव मला उलटतां येत नाहीं.” ३६ तेव्हां ती त्याला बोलली, “हे माझ्या बापा, त्वा आपलें तोंड परमेश्वराजवळ उघडिलें आहे, तर तुझ्या तोंडांतून जें निघालें, त्याप्रमाणें तूं मजसीं कर; कारण कीं परमेश्वराने तुझे शत्रू आम्मोनी लोक यांचे तुझ्यासाठीं पक्कें सूड घेतलें आहे.” ३७ अणखी तिने आपल्या बापाला म्हटलें, “मजसाठीं ही गोष्ट होऊं द्दावी; मला दोन महिन्यांची रजां दे, म्हणजे मी आपल्या सोबतिणींसुध्दां डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारपणाविषयीं रडेन.” ३८ तेव्हां त्याने म्हटलें, “जा.” असें त्याने तिला दोन महिने सोडिलें, आणि ती आपल्या सोबतिणींसुध्दां डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारपणाविषयीं रडलीं. ३९ मग दोन महिन्यांच्या शेवटीं असें झालें कीं ती आपल्या बापाजवळ माघारी आली, नंतर त्याने आपला केलेला नवस तिजवर फेडिला; असें तिने पुरूष जाणिला नाहीं, आणि इस्त्राएलांत असी रिति झाली कीं, ४० प्रत्येक वर्षी इस्त्राएलांतल्या कन्यानी इफताह गिलादी याच्या कन्येचें वर्णन करायाला वर्षाचे चार दिवस जात जावें.