१४
१ नंतर शामशोन खालीं तिमनाथास गेला, आणि त्याने तिमनाथांत पलिष्टयांच्या कन्यांतली एक स्त्री पाहिली. २ मग त्याने वर येऊन आपल्या बापाला व आपल्या आईला सांगून म्हटलें, ''म्या तिमनाथांत पलिष्ट्यांच्या कन्यांतली एक स्त्री पाहिली आहे; तर आतां तुम्ही ती माल बायको करून घ्या.'' ३ तेव्हां त्याच्या आईबापानी त्याला म्हटलें, ''तुझ्या भावांबंदाच्या कन्यांत व माझ्या सर्व लोकांतहि कोणी स्त्री नाहीं म्हणून तूं असुंती पलिष्ट्यांतली बायको करून घ्यायाला जातोस कीं काय?'' तथापि शामशोनाने आपल्या बापाला म्हटलें, ''ती मजसाठीं मिळीव; कां तर ती माझ्या दिसण्यांत चांगली आहे,'' ४ हें तर परमेश्वराकडून झालें कीं त्याने पलिष्ट्याविषयीं निमित्त शोधून काढावें, असें त्याच्या आईबापांस कळलें नव्हतें; कां कीं त्या वेळेस पलिष्टी इस्त्राएलावर अधिकार करित होते. ५ यानंतर शामशोन आणि त्याचे आईबाप खालीं तिमनाथास जात होते, आणि तिमनाथांतल्या द्राक्षमळ्यांपर्यंत पोहंचले असतां पाहा, सिंहांतला तरणा सिंह त्याजवर येऊन गर्जला. ६ तेव्हां परमेश्वराच्या आत्माने त्याला व्यापिलें, यास्तव त्याच्या हातीं काहीं नसतांहि त्याने जसें करडूं फाडावें, तसें त्याला फाडून टाकिलें; परंतु आपण जे केलें होतें तें त्याने आपल्या आईबापांस सांगितलें नाहीं. ७ शामशोन तर खालीं जाऊन त्या स्त्रीला बोलला; तेव्हां ती त्याला चांगली दिसून आली. ८ मग कांहीं वेळानंतर तो तिला करून घेण्यास फिरून गेला, तेव्हां त्या सिंहाचें कलेवर पाहाया, वळला; तर पाहा, त्या सिंहाच्या कलेवरांत मधमाश्यांचा झुपका व मध होती. ९ तेव्हां त्याने ती आपल्या हातीं घेऊन चालतां चालतां खाल्ली, आणि आपल्या आईबापांजवळ जाऊन त्यांस दिल्ही, आणि त्यानी खाल्ली; कां कीं त्याने ती मध त्या सिंहाच्या कलेवरांतून घेतली होती, हें त्यांस सांगितलें नाहीं. १० नंतर त्याचा बाप त्या स्त्रीच्याजवळ उतरून गेला आणि शामशोनाने तेथे जेवणावळ केली, कां तर नवेतरणे तसी करीत होते. ११ तेव्हां त्यानी त्याला पाहिल्यावर असें झालें कीं त्यानी तीस सवंगडी त्याच्यासंगतीं राहाया, आणिले. १२ मग शामशोन त्यांस म्हणाला, ''आतां मी तुम्हास कोडें घालितों; जेवणावळीच्या सात दिवसांत जर तुम्ही तें मला निश्चयें सांगाल, म्हणजे उगवाल, तर मी तुम्हास तीस पासोडया व वस्त्रांचे तीस पोषाक देईन. १३ परंतु जर तुमच्याने माझ्याजवळ व सांगवलें, तर तुम्ही मला तीस पासोडया व वस्त्रांचे तीस पोषाक द्दावे.'' तेव्हां ते त्याला बोलले, ''तूं आपले कोडें घाल, म्हणजे आम्ही तें ऐकूं.'' १४ तेव्हा तो त्यास बोलला, ''खाणा-यांतून खाद्द निघालें, तसें बळकटांतून गोड निघाले.'' तीन दिवसांत तर त्यांच्यानी तें कोडें सांगवलें नाहीं. १५ नंतर सातव्या दिवसीं असें झालें कीं त्यानी शाम्शोनाच्या स्त्रीला सांगितलें, “तूं आपल्या नवऱ्याला असी फूसलाव कीं त्यने तें कोडें आम्हास कळवावें, नाहीं तर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या घराला भाग लावून जाळूं; तुझी आमचें हरन करून घ्यावें म्हणून आम्हास बोलावलें कीं काय?” १६ तेव्हां शाम्शोनाची स्त्री त्याच्याजवळ रडत बोलली, “तूं केवळ माझा द्वेष करितोस; मजवर प्रीति करीतच नाहींस; तव माज्या लोकांतले तरणे यांस कोडें घटलें आहे, आणि तें मला सागितले. नाही.” परंतु तो तिला बोलला, “पाजा, म्या आपल्या आईबपंस सांगितलें नाहीं, तर तुंला कसें सांगावें?” १७ आणि ज्या सात दिवसांत त्यांची जेवणावळ होत होती, त्यांत ती त्याजवळ रडली; मग सातव्या दिवसीं असें झालें कीं त्याने तिला सांगितलें, कां तर तिने त्याला पेचाटींत घातलें होतें; मग तिने तें कोडें आपल्या लोकांतल्या तरण्यास सांगितलें. १८ यास्तव सातव्या दिवसीं सूर्य मावळल्यापूर्वी त्या नगरातल्या माणसांनी त्याला म्हटलें, “मधेपेक्षा गोड काय? आणि सिहापेक्षा बळकट काय?” तेव्हां तो त्यांस बोलला, “ जर तुझी माझ्या काल्व्डीने नांगरीले नसतें, तर तुझी माझें कोडें उगविलें नसतें.” १९ नंतर परमेश्वराच्या आल्याने त्याला प्रेरिलें, आणि त्याने खालीं आश्क्लोनास जाऊन त्यांतले तीस पुरुष मारिले, मग त्यांची वस्त्रें गेऊन कोडें सांगणाऱ्यांस ते पाशक दिल्हें; परंतु त्याचा राग पेटला होत, यास्तव तो आपल्या बापाच्या घरीं गेला. २० मग शाम्शोनाची स्त्री त्याचा सवंगडी जो त्याने आपल्याजवळ मित्र्रूपें वागविला होता, त्याची झाली.