१७
१ एफ्राइमाच्या डोंगरावरला एक माणूस होता; त्याचें नांव तर भिखा. २ आणि त्याने आपल्या आईला म्हटलें, “जें अकराशें शेकेल रूपें तुझ्याजवळून घेतलें गेलें, आणि ज्यामुळें तवा शाप दिल्हे, आणखी तूं माझ्या कानासीं बोललीस पाहा, तें रूपें माझ्याजवळ आहे; म्या तें घेतलें.” तेव्हां त्याची आई बोलली, “हे माझ्या पुत्रा, परमेश्वराकडून तुला आशीर्वाद होवो. ३ मग त्याने तें अकराशें शेकेल रूपें आपल्या आईला माघारें दिल्हें; तेव्हां त्याच्या आईने म्हटलें, “म्या आपल्या पुत्रासाठीं कोरीव व ओतीव मूर्ति करायास आपल्या हाताने हें रूपें परमेश्वराला अर्पण करून दिल्हें होते; तर आतां मी हें तुला माघारें देतें.” ४ तथापि त्याने तें रूपें आपल्या आईला माघारें दिल्हें, मग त्याच्या आईने दोनशें शेकेल रूपें घेऊन तें सोनाराला दिल्हें, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ति केली; नंतर ती मिखाच्या घरीं राहिली. ५ तसा तो माणूस भिखा, त्याल देवांचें घर होतें, आणि त्याने याजकाचें एफोद व मूर्ति केल्या होत्या; आणखी त्याने आपल्या एका पुत्राला कर्मदीक्षा दिल्ही, आणि हा त्याचा याजक झाला. ६ त्या दिवसांत इस्त्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येकाने आपापल्या दिसण्यांत जे योग्य, तें केलें. ७ तेंव्हां यहुदी कुळांतला कोणी तरूण बेथलेहेम यहुदांतला होता; आणि तो लेवी असतांहि तेथें राहत होता. ८ नंतर तो माणूस जेथें जागा मिळेल, तेथें राहायाला बेथलेहेम यहुद्दांतल्या नगरांतून निषाला; मग आपल्या मार्गाने चालतांना एफ्राइमाच्या डोंगरावर भिखाच्याघरापर्यंत पोहंचला. ९ मग भिखा त्याला बोलला, “तूं कोठून आलास?” तेव्हां तो त्याला बोलला, “बेथलेहेम यहूद्दांतला लेवी मी आहें; आणि जेथें जागा मिळेल, तेथें राहायास मी जात आहें.” १० तेव्हां भिखा त्याला बोलला, “तूं माझ्याजवळ राहा, आणि मला बाप व याजक असा होऊन एस, म्हणजे मी तुला प्रती वर्षी दाह शेकेल रूपें व पोशाक व तुझें उपजीवन देईन.” मग तो लेवी आंत गेला. ११ आणि त्या माणसाजवळ राहायाला तो लेवी मान्य झाला ; तसा तो तरणा त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारिखा झाला. १२ आणि मीखाने त्या लेवीला कर्मदीक्षा दिल्ही, आणि तो तरणा त्याचा याजक झाला आणि भिखाच्या घरीं राहिला. १३ नंतर भिखा बोलला, “आतां मला कळलें कीं परमेश्वर माझें बरें करील, कारण कि लेवी माझा याजक झाला आहे.