१९
१ आणि त्या दिवसांत जेव्हां इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हां असें झालें कीं कोणी लेवी एफ्राइमच्या डोंगराच्या बाजूजवळं प्रवास करीत होता; आणि त्याने आपल्याला बेथलेहेम यहूद्दांतून उपपत्ती असी स्त्री करून घेतली. २ नंतर त्याच्या उपपत्तीने त्यावर व्यभिचार केला, आणि ती त्याला सोडून बेथलेहेम यहुद्दांत आपल्या बापाच्या घरीं जाऊन तेथें चार महिने इतके दिवस राहिली. ३ तेव्हां तिचा धनी उठून थीच्या मनोगताप्रमाणें बोलून तिला माघारे आणावें म्हणून तिच्या चाकर व गाढवांची जोड होती, तेव्हां तिने त्याला आपल्या बापाच्या घरांत नेलें, आणि त्या तरणीचा बाप त्याला पाहून त्याच्या भेटीवरून संतुष्ट झाला. ४ वास्तव त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या तरणीच्या बापाने त्याला फार आग्रह केला; म्हणून तो त्याजवळ तीन दिवस राहिला, आणि तीं खाऊन पिऊन तेथें वस्तीस राहिलीं. ५ मग चवथ्या दिवसीं असें झाले कीं ते सकाळीं उठल्यावर तो बायला उभा राहिला, परंतु त्या तरणीच्या बापाने आपल्या जावायाला सांगितलें, “तूं आपल्या पोटाला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.” ६ यास्तव तीं राहून त्या दोघानी एकत्र खाणें केलें; नंतर त्या तरुणीच्या बापाने त्या माणसाला म्हटलें. “तू तरी मान्य होऊन रात्रीं राहा, आणि तुझ्या मनाला सुख होवो.” ७ तरी तो माणूस आयाला उठला, परंतु त्याच्या सासऱ्याने त्याला आग्रह केला, म्हणून तो पुन्हां तेथें रात्रीं राहिला. ८ नंतर पाचव्या दिवसीं सकाळीं तो जायाला सिद्ध झाला, परंतु त्या तरणीच्या बापाने म्हटलें., “तूं अगत्य आपल्या पोटाला आधार कर.” तेव्हां दिवस फिरला तोपर्यंत त्यानी उशीर केला, आणि ते दोघे जेवले. ९ नंतर तो पुरुष आपली उपपत्ती व आपला चाकर यासुद्धां जायाला उठला, परंतु त्या तरणीचा बाप त्याचा सासरा त्याला बोलला, “आतां पाहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही या रात्रीं राहा; पाहा, दिवस थोडा राहिला, एथें वस्ती करून आपल्या मनाला सुख होवो; मग सकाळीं उठून आपल्या मार्गाने आपल्या घरास जा.” १० परंतु तो माणूस राहायला मान्य न होऊन उठून चालला, मग यबुस तेंच यरुशालेम त्याच्यासमोर आला; तेव्हां त्याच्या संगतीं आवळलेल्या गाढवांची जोड, आणि त्याची उपपत्ती त्याच्यासंगतीं होती. ११ ते यबूसजवळ होते तेव्हां दिवस फार उतरला होता, यास्तव त्या चक्राने आपल्या धन्याला म्हटलें, “कृपा करून चाल, म्हणजे आपण यबूस्यांच्या या नगराकडे वळून. त्यांत वस्ती करूं.” १२ परंतु त्याचा धनी त्याला बोलला, “जे परके इस्राएलाच्या संतानांतले नाहींत, त्यांच्या नगरांत जायला एथें आम्ही वळणार नाहीं; तर गिब तेथवर जाऊं.” १३ अणखी त्याने आपल्या चक्राला सांगितलें, “चाल, म्हणजे आपण एखाद्दा ठिकाणीं पोहंचून गिब किंवा राम त्यांत वस्ती करूं.” १४ मग ते पुढें चालत गेले; आणि बन्यामीनाचा जो गिबा त्याजवळ त्यांस सूर्य मावळला. १५ तेव्हां गीब्यांत वस्ती करायाला ते तिकडे वळले, नंतर तो जाऊन नगरच्या चव्हाट्यावर बसला, परंतु त्यांस रात्रीं राहायास कोणी आपल्या घरीं घेऊन गेला नाहीं. १६ मग पाहा, संध्याकाळीं एक म्हातारा माणूस शेतांतून आपल्या कामावरून येत होता; तोही माणूस एफ्राइमाच्या डोंगरावरला होता, परंतु गिब्यांत प्रवासी होता आणि त्या ठिकाणांतलीं माणसें बऱ्यामीनी होतीं. १७ त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चव्हाट्यावर तो वाटसरू माणूस पहिला; तेव्हां तो म्हतारा माणूस बोलला, “तूं कोणीकडे जातोस, आणि कोठून आलास?” १८ तेव्हां तो त्याला बोलला, “ आम्ही बेथलेहेम यहुद्दवून एफ्राइम डोंगराच्या बाजूकडे चालत आहो; तेथला मी आहें ; परंतु बेथलेहेम यहुद्दास गेलों होतों, आणि मला परमेश्र्वराच्या मंदिरास खायचे आहे; तर कोणी मला घरीं घेत नाहीं. १९ तरी आमच्या गाढवांसाठीं वेरण व दाणाहि आहे, आणखी मजसाठीं व तुझ्या चकारणीसाठीं आणि तुझ्या सेवकाच्यासंगतीं जो चाकर त्यासाठीं भाकर व द्राक्षारस आहे, कोणत्याहि गोष्टीचें उणे नाही.” २० तेव् तो म्हातारा माणूस बोलला, “तूं सुखरूप ऐस, तुला जें काहीं पाहिजे तें मजवर मात्र असो, तूं केवेळ चव्हाट्यात वस्ती करू नको.” २१ तेव्हां त्याने त्याला आपल्या घरीं नेलें, आणि गाढवास पुराव केला, नंतर त्यानी आपले पाय धुऊन खाल्लें व प्यालें. २२ त्यानी आपलें मन स्वस्थ केलें तेव्हां पाहा, त्या नगरांतल्या माणसानी म्हणजे कोणी दुष्ट लोक, अशा माणसानी घराला वेढून दारावर धक्के दिल्हे, आणि घरधनी तो म्हातारा माणूस याला असें सांगितलें कीं, “ जो माणूस तुझ्या घरांत आला आहे, त्याल तूं बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याल जणूं” २३ मग तो घरधनी माणूस बाहेर त्यांजवळ बाऊन त्यांस बोलला, “अहो, माझे भाऊ नका, मी मागतों, तुम्ही दुष्टाई करूं नका; हा माणूस माझ्या घरीं आल, तर तुम्ही हे मूर्खपण करूं नका. २४ पाहा, माझी तरुण कन्या व याची उपपत्ती यांस मी बाहेर आणीन; मग तुम्ही त्यांस भंगून तुमच्या दिसण्यांत जे बरें, तें त्यांसीं करा; परंतु या पुरुषाला अशा दुष्टाईचें कृत्य करूं नका.” २५ तथापि तीं माणसें त्याचें ऐकायाला मान्य झालीं महींत; तेव्हां त्या माणसाने आपली उपपत्ती घेऊन बाहेर त्यांजवळ आणिली, मग त्यानी तिचा अनुभव घेतां तिजसीं सारी रात्र सकाळपर्यंत कुकर्म केलें; नंतर पाहाट झाली असतां तिला सोडिलें. २६ तेव्हां सकाळच्या वेळेस ती स्त्रीयेऊन जेथे आपला धनी होता, त्या मागसाच्या घराच्या दाराजवळ उजेड होई तोपर्यंत पडून राहिली. २७ तेव्हां सकाळीं तिच्या ज्ञाने उठून घराचीं दारें उघडलीं, आणि आपल्या मार्गाने बायाला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती स्त्री त्याची उपपत्ती घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंब्रऱ्यावर होते. २८ तेव्हां त्याने तिला म्हटलें, “उठ, म्हणजे आपण बाऊं.” परंतु कोणी उत्तर दिल्हें नाहीं; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणीं गेला. २९ मग आपल्या घरीं पोहचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपली उपपत्ती घेऊन तिला तिच्या हाडांसुद्धां कापली बारा तुकडे केले, मग ती इस्राएलाच्या अवघ्या स्वानांत पाठविली. ३० नंतर असें झलें कीं त्या प्रत्येकाने पहिलें, त्यानी म्हटलें, “मिसर देशांतून इस्राएलाचीं संतानें आलीं, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारिखें झालें नाहीं, आणि दृष्टीस पडलें नाहीं; यावर तुम्ही आपलें चित्त देवून विचार करा, आणि बोला.”