१ आणि योना ने परमेश्वर जो आपला देव त्याची प्रार्थना मास्याच्या पोटात केली २ आणि म्हटले म्या आपल्या संकटामुळे परमेश्वराकडे हाक मारली, तेव्हां त्याने मला उत्तर दिले;म्या मृत्लोकाच्या पोटातून आरोळी मारिली ,तेव्हा तू माझा शब्द ऐकिला. ३ का कि तू मला समुद्राच्या मध्यभागी टाकिले,आणि प्रवाहाने मला वेढिले,तुझ्या सर्व उसळत्या व लोळत्या लटा माझ्यावर गेल्या. ४ तेव्हा मी म्हणालो मी तुझ्या दृष्टीसामोरून टाकलेला आहे;तथापि मी तुझ्या देवळाकडे पुन्हा पाहीन. ५ पाण्याने मला प्रनापर्यंत झाकिले; आणि डोहाने मला वेढिले,समुद्र शेवाळ माझ्या डोईस वेष्टीले होते ६ मी पर्वतांच्या तळा पर्यंत उतरलो; पृथ्वीचे सर्वकाल्चे अडसर माझ्भोवती होते; तथापि परमेश्वरा माझ्या देवा , तू माझा जीव खाचेतून वरती काढला आहे ७ तेव्हा माझा जीव माज्या ठाई मुर्चीत झला;तेव्हा मी परमेश्वराला स्मरले आणि माझी विनंती तुझ्या पवित्र देवळात पोहंचली. ८ जे खोट्या व्यार्थपणाकडे आपले चित्त लावतात ते आपला दयासागर सोडतात. ९ परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझकडे यज्ञ करीन;जो नवस मी केला आहे तो मी फेडीन. तरण परमेंश्वराकडून आहे. १० अणि परमेश्वराने त्या मत्स्याला झापिले;तेव्हा त्याने योना कोरड्या भुमीवर ओकून टकीला.