१ इस्राएल लोक यार्देन नवी ओलांडतात. यहोशवा पहाटेस उठला आणि सर्व इस्राएल लोकांसव शिट्टीमाहून कूच करून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. २ तीन दिवसानंतर अमलदार छावणीतून फिरले ३ व त्यंनी लोकांना आशी आज्ञा केली की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश लेवीय याजक वाहून नेत असतांना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून त्याच्या पाठोपाठ जा; ४ पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेनें तुम्हाला जावयाचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण ह्यापूर्वी ह्या वाटेनें तुम्ही कधी गेले नाही. ५ मग यहोशवा लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अदभूत कृत्ये करणार आहे. ६ नंतर यहोशावा याकाना म्हणाला, कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढें चाला त्याप्रमाणें ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. ७ परमेश्वर यहोशवाला म्हणाला, आज मी सर्व इस्राएलाच्या द्रुष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होती तसाच तुझ्याबरोबरहि आहे हे त्यांनाकळून येईल. ८ कराराचा कोश वाहणाऱ्या याज्काना आज्ञा कर की, जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देनेंत उभे राहा. ९ मग यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका, १० यहोशवा म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, प्रीरज्जी गिर्गाशी, अमोरी व यबुसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीनें हाकून देईल हें येंणेंप्रमाणे तुम्हाला कळून येईल. ११ अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. १२ तर आता वशातून बारा पुरुष तुम्ही निवडा; प्रत्येक वंशातून एक एक. १३ अखिल पृथ्वीचा जो प्रभु परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचें पाणी थांबून साचेल व त्याची राम होईल. १४ लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यांतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. १५ कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते). १६ तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून चडलें व त्याची राम झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र ह्याकडे जात होतें तें अगदीं वाहून गेलें; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले. १७ परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारें सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे गेलें