१ यार्देन नदींतून घेतलेले बारा धोंडे राष्ट्रांतील झाडून सारा लोक यार्देनेपलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशवाला म्हणाला, २ प्रत्येस वंशांतून एक असे बारा पुरुष लोकांमधून निवडा ३ आणि त्यांना अशी दे : मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथें स्थिर झाले होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या स्थळीं तुमचा मुक्काम होईल तेथें ते ठेवा. ४ मग यहोशवानें इस्राएल लोकांतील वंशांतून एक असे जे बारा पुरुष तयार ठेवले होते त्यांना बोलाविलें. ५ यहोशवा त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या माध्यमातून जाऊन इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या, ६ म्हणजे हें तुमच्यामध्ये चीन्हादाखल होईल, आणि पुढे तुमची मुलेबाळें विचारतील कीं, ह्याधोंड्यांचें तुमच्या दृष्टीनें काय महत्व आहे? ७ तेव्हा तुम्ही त्यांना सांगा कीं, यार्देनेचें पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढें दुभंगलें; तो यार्देनेंतून पलीकडे जात असतांना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारें हे धोंडे इस्राएल लोकांसाठीं कायमचें स्मारक होतील. ८ याहोशच्या ह्या आज्ञेप्रमाणें इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराणे याहोशाळा सांगितल्याप्रमाणें त्यांनीं इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणें त्यांनी मध्यभागांतून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले. ९ तसेंच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या योजकांचे पाय जेथें स्थिर झाले होते तेथे याहोशवानें बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथें आहेत. १० मोशेनें यहोशवाला जें आज्ञापिलें होतें तेंच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वरानें यहोशवाला केली; त्याप्रमाणें करण्याचें संपेर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागीं उभे राहिले. मग लोक लवकर लवकर पार उतरून गेले. ११ झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. १२ रउबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकंपुढे पलीकडे गेले, १३ युद्धासाठी सज्ज झालेले सुमारें चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून युरीहोजवलच्या मैदानांत पोहंचले. १४ त्या दिवशी परमेश्वरानें सर्व इस्राएलच्या दृष्टीने यहोशवाचीं थोरवी तसेंच त्यांनी यहोशवाचें भय त्यच्या सगळ्या हयातींत बाळगलें. १५ परमेश्वर यहोशवाला म्हणाला १६ साक्षापटाचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेंतून तून वर येण्यची आज्ञा कर. १७ त्याप्रमाणे यहोशवानें याजकांना केली. १८ मग परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या माध्यभागांतून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड जमिनीला लागतांच यार्देनेचेयार्देने पाणी मुळ ठिकाणीं परत आलें आणि पूर्ववत् दुथडी भरून वाहूं लागलें. १९ पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यारीहोच्या पूर्व सीमेवरील गीलगाल येथें डेरे दिले. २० यार्देनेंतून उचलुन आणलेले बारा धोंडे यहोशवानें गीलगाल येथें उभे केले. २१ तो इस्राएल लोकांना म्हणाले की, पुढें जेव्हा तुमची मुलेंबाळे आपआपल्या वडिलांना विचारतील, ह्या धोंड्यांचें मह्त्व काय? २२ तेव्हा तुम्हीं त्यांना सांगा की, इस्राएल ह्या यार्देनेच्या कोरड्या पत्रांतून चालत पार आले. २३ आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्यानें तो तिचें पाणी आटवून ती कोरडी केली २४ ह्या वरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल. आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना निरंतरधाक वाटेल.