१ गीबोनाच्या रहिवाश्यांची फसवेगिरी हे ऐकून यार्देनेच्या पश्चिमेकडे डोंगरवटींत, तलवटींत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनाऱ्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि युबसी ह्यांचे सर्व राजे २ एकोपा करून यहोशवा व इस्राएल ह्यांच्याशी लढावयाला जमा झाले. ३ यहोशवानें येरीहो आणि आय ह्या नगरांचें काय केलें हें गीबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकलें, ४ तेव्हा आपल्यापरीनेत्यांनींही कपटाची युक्ती योजिली; त्यांनी प्रवासासाठीं शिधासामुर्गी घेतली आणि आपल्या गाढवांवर जुनीं गोणताटे व झिजलेले, फाटलेले, ठिगळें लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले; ५ त्यांनी आपल्या पायांत झिजलेले व ठीगळांचे जोडे घातले, अंगांत जुने पृने कपडे चढविले; त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुर्सल्या होत्या ६ ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, आम्ही दूर देशांहून आलों आहोंत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा. ७ इस्राएल परुषांनीं त्या हिव्ही लोकांना म्हटलें, आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा ? न जाणो तुम्ही आमच्यामध्येंच राहणारे आसल. ८ ते यहोशवाला म्हणाला, आम्ही तुझे दास आहों यहोशवानें त्यांना विचारले, तुम्ही कोण व कोठून आला? ९ त्यांनी त्याला म्हटलें तुझा देव परमेश्वर ह्यांचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ति व त्यानें मिसर देशांत जें जें केलें तें सर्व आम्ही ऐकलें आहे; १० आणि यार्देनेच्या पलीकडील अमोर्यांचे राजे, हेशबोनाचा राजा सिहोन आणि अष्टरोथनिवासी बशानाचा राजा ओगे, ह्या दोघांचे त्या काय केलें हेंहि आम्ही जाणून आहों. ११ तेव्हा आमची वडील माणसें आणि आमच्या देशांतील. सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा कि, आम्ही तुमचे दास आहोंत, तेव्हां आतां आमच्याशी करारमदार करा. १२ ह्या पाहा आमच्या भाकरी ! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालों त्या दिवशीं, प्रवासांत शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या ऊनऊन होत्या; पण आतां त्या वळून बुरसल्या आहेत. १३ हे द्रक्षारासाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत ; हे आमचे जोडे फार लांबच्या प्रवासानें जीर्ण झाले आहेत. १४ तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले; पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाहीं. १५ मग यहोशवानें त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवनदान देण्याचा करार केला ; मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशीं आणभाक केली. १६ त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजलें कि, हे आपले शेजारी असून आपल्यामध्यें राहणारे आहेत. १७ नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशीं त्यांच्या नगरस जाऊन पोहंचले त्यांच्या नगरांची नांवे हि: गीबोन,कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम. १८ पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकलें नाही, कारण मंडलीच्या सरदारांनी इस्राएलाच देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व मडळीनें सरदारांविरुद्ध कुरकुर केली. १९ तेव्हां सर्व सरदार सगळ्या मंडलीला म्हणाले, आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हाला त्यांना हात लावितां येत नाही. २० त्यांचाशी आम्ही असेंच वागणार ; त्यांना आम्ही जीब्दन देणार ; तसें न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळें आम्ही कोधास पात्र ठरूं. २१ सरदारांनीं लोकांना सांगितलें कीं, त्यांना जिवंत राहूं द्दा. सरदारांनीं त्या सांगितल्या प्रमाणें ते सर्व मंडलीचे लाकूडतोड्ये व पाणक्ये झाले. २२ यहोशवानें त्यांना बोलावून म्हटलें तुम्ही आमच्यामध्यें राहत असून आम्ही फार दूरचे आहोंत असें सांगून आम्हांला कां फसविलें ? २३ म्हणून आतां तुम्हांला असा शाप आहे की, तुम्च्यान्तल्या कोणालाहि दास होणें चुकावयाचें नाही; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठीं लाकूडतोड्ये व पानक्ये होऊन राहाल. २४ त्यांनीं यहोशवाला उत्तर दिलें, हा सर्व देश तुम्हांला द्दावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्यांचा संहार करावा असें तुझा देव परमेश्वर ह्यानें आपला सेवक मोशे ह्याला आज्ञापिलें होतें, हें तुझ्या दासांना पक्कें कळलें होते ; तुमच्यामुळें आम्हांला आमच्या जीवाची भीति वाटली म्हणून आम्हीं हें काम केलें. २५ आता पाहा, आम्ही तुझ्या हातांत आहोंत ; तुला बरें व योग्य दिसेल तसें आमचें कर. २६ त्यानें त्याचें तसें केलें ; त्यांना इस्राएल लोकांच्या हातांतूनसोडविले ; त्यांची कत्तल केली नाहीं. २७ यहोशवानें त्या दिवशीं मंडळीसाठीं आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानीं त्याच्या वेदिसाठीं त्यांना लाकूडतोड्ये व पाणक्ये म्हणून नमले ; तसे ते आजपर्यंत आहेत.