१६
१ आणि योसेफाच्या संतानांच्या देवभागाची सीमा यरिहोपासून डोंगरावर बेथएलास चढून जाती. २ मग बेथएलापासून लुजास जाऊन अटरोथातले आर्की यांच्या सीमेपर्यंत जाती. ३ मग पश्चिमेस याफ्लेटी यांच्या सीमेवरून खालच्या बेथहोरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेरापर्यंत उतरती; आणि तिच्या गती समुद्रापर्यंत आहेत. ४ याप्रमाणें योसेफाचीं संतानें मनाश्शे व एफ्राइस यांस वतन मिळालें. ५ आणखी एफ्राइमाच्या संतानांचे जे त्यांची सीमा कुळांकुळांप्रमाणें असी पडली की त्यांच्या वतनाची सीमा आटरोथ आदार याच्या पूर्वेपासून वरल्या बेथहोरो ना पर्यंत होती. ६ आणि ती सीमा मिख्मथाथाजवळच्या समुद्राकडे उत्तरेस जाती, आणि पूर्वेस तानाथ शिलोपर्यंत ती सीमा फिरती, मग त्याजावळून पूर्वेस यानोहा तेथवर बाती. ७ नंतर यानोहा पासून भेटरोथास व नाराथास उतरती, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस जाती. ८ ताप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत तो सीमा जाती; अशा तिच्या गती समुद्रापर्यंत आहेत; एफ्राइमाच्या संतानांच्या वंशांचे त्यांच्या कुळांममाणे हेंच वतन आहे. ९ आणि मनाश्श्याच्या संतानांसाठी वतनामध्यें कित्येक नगरें एफ्राइमाच्या संतानांसाठी वेगळी केलेलीं होतीं; तीं सर्व नगरें त्यांकडल्या गांवांसुद्धा होती; १० तथापि जे खानानी गेजेरांत राहत होते. त्यांस त्यांनी घालविलें नाहीं; यास्तव ते खनानी एफ्राइमामध्यें आजपर्यंत राहत आले; तथापि करणे चाकर झाले.