२१
१ तेंव्हा खनान देशांत शिलोमध्यें एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्त्राएलाच्या संतानांच्या वंशाचे वडील अधिकरी यांजवळ लेव्यांचे वडील अध्यक्ष येऊन त्यांस असें बोलले कीं, २ ''परमेश्वराने मोश्याच्यायोगें याप्रमाणें आज्ञा दिल्ही होती कीं आम्हास राहण्यासाठीं नगरें आणि आमच्या पशूंसाठीं त्यांचे शिवार द्दावें.'' ३ यास्तव इस्त्राएलाच्या संतानानी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणें आपल्या वतनांतून हीं नगरें आणि यांचे शिवार लेव्यांस दिल्हे. ४ तेव्हा कहाथीच्या कुळांसाठीं देवखूण असी निघाली कीं लेव्यांतला आहरोन याजत याच्या संतानांस यहूद्दाच्या वंशांतलीं व शिमोन्याच्या वंशांतलीं व खन्यामीनाच्या वंशांतलीं तेरा नगरें देवखुणेकरून प्राप्त झालीं. ५ आणि कहाथाच्या राहिलेल्या संतानांस एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळांतलीं व दानाच्या वंशांतलीं व मनाश्श्याच्या अर्धा वंशातलीं देवखुणेकरून दाहा नगरें प्राप्त झालीं. ६ आणि गेर्षोनाच्या संतानांस इस्साखाराच्या वंशांतल्या कुळांतलीं व आशेराच्या वंशांतलीं व नाफतालीच्या वंशांतलीं व बाशानांत मनाश्श्याच्या अर्ध्या वंशांतलीं, तेरा नगरें देवखुणेकरून प्राप्त झालीं. ७ अरारीच्या संतानांस त्यांच्या कुळांप्रमाणें, रऊबेनाच्या वंशांतलीं, व गादाच्या वंशांतलीं, व जबूलुनाच्या वंशांतलीं, बारा नगरें प्राप्त झालीं. ८ म्हणजे जरी परमेश्वराने मोश्याच्यायोगें आज्ञा दिल्ही होती, तेसें इस्त्राएलाच्या संतानानी देवखुणेकरून हीं नगरें आणि यांचे शिवार लेव्यांस दिल्हे. ९ असीं यहूदाच्या संतानांच्या वंशांतलीं व शिमोनांच्या संतानाच्या वंशांतलीं नगरें, त्यांचीं नावें सांगितलेलीं आहेत, तीं हीं त्यानी दिल्ही. १० तर लेवीच्या संतानांत कहाथीच्या कुळांतल्या आहरोनाच्या संतानांस प्रथम देवखूण झाली, यास्तव त्यांस असें प्राप्त झालें, ११ कीं त्यानीं यहूद्दाच्या डोंगरवटीवर अनोकाचा बाप आर्बा याचें शहर, तेंच हेब्रोन, तें आणि त्याचे चहुंकडले शिवार त्यांस दिल्हे. १२ परंतु नगराची शेतभूमी व त्याकडलीं खेडीं यफून्न्याचा पुत्र. कालेब याला वतन करून दिल्हीं होतीं. १३ तसें त्यानी आहरोन याजक याच्या संतानांस हत्या करणा-याच्या आश्रयाचें हेब्रोन नगर व त्याचे शिवार दिल्हे, आणि लिबूना व त्याचे शिवार; १४ आणि यात्तीर व त्याचे शिवार, आणि एष्टमोवा व त्याचे शिवार; १५ आणि होलोन व त्याचे शिवार आणि दबीर व त्याचे शिवार; १६ आणि आइन व त्याचे शिवार, आणि युट्टा व त्याचे शिवार, बेथशेमेश व तिचे शिवार; असीं त्या दोन वंशांतलीं नऊ नगरें दिल्ही; १७ आणि खन्यामीनाच्या वंशांतलें गिबोन व त्याचे शिवार; जेबा व त्याचे शिवार; १८ अनाथोथ व त्याचे शिवार, आणि आल्मोन व त्याचे शिवार, असीं नगरें चार. १९ आहरोनाचीं संतानें जे याजक त्यांचीं सर्व नगरें, तेरा नगरें व त्याचे शिवार. २० आणि कहाथाच्या संतानांची कुळें, कहाथाच्या संतानातले राहिलेले लेबी, यांस तर यांच्या देवभागाचीं नगरें एफ्राइमाच्या वंशांतलीं प्राप्त झालीं. २१ म्हणजे त्यानीं हत्या करणा-याच्या आश्रयासाठीं एफ्राइमाच्या डोंगरावरलें नगर शखेम व त्याचे शिवार त्यांस दिल्हे; आणि गेजेर व त्याचे शिवार; २२ आणि किब्जाइम व त्याचे शिवार; आणि बेथहोरोन तिचे शिवार असीं नगरें चार दिल्ही; २३ आणि दानाच्या वंशांतलें एल्टके व त्याचे शिवार, गिब्बथोन व त्याचे शिवार; २४ आय्यालोन व त्याचे शिवार गार्थारेम्मोन व त्याचे शिवार, असीं नगरें चार दिल्हीं; २५ आणि मनाश्श्याच्या अर्धा वंशांतले तानाख व त्याचे शिवार, असीं नगरें दोन दिल्हीं; २६ कहाथाच्या राहिलेल्या संतानांच्या कुळांस सर्व नगरें दाहा व त्यांचे शिवार. २७ आणि लेव्यांच्या कुळांतल्या गेर्षोनाच्या संतानांस मनाश्श्याच्या दुस-या अर्धा वंशांतलें हत्या करणा-याच्या आश्रयाचें नगर बाशानांतलें गोलान व त्याचे शिवार, आणि वेष्टरा व त्याचे शिवार, असीं नगरें दोन दिल्हीं; २८ आणि इस्साखाराच्या वंशातलें किश्योन व त्याचे शिवार, दाब्राथ व त्याचे शिवार; २९ यार्मूथ व त्याचे शिवार, एनगान्नीम व त्याचे शिवार, असीं नगरें चार दिल्हीं; ३० आणि आशेराच्या वंशांतलीं मिशाल व त्याचे शिवार, भाब्दोन व त्याचे शिवार, ३१ हेलकाथ व त्याचे शिवार, आणि रहोब व त्याचे शिवार, असीं नगरें चार दिल्हीं; ३२ आणि नाफतालीच्या वंशातलें हत्या करणा-याच्या आश्रयाचें नगर गालीलांतलें केदेश व त्याचे शिवार, आणि हामोथदोर व त्याचे शिवार, आणि कार्तान व त्याचे शिवार, असीं नगरें तीन दिल्हीं. ३३ गेर्षोन्याचीं सर्व नगरें त्याच्या कुळांप्रमाणें तेरा नगरें व त्याचे शिवार. ३४ आणि राहिलेले लेवी मरारीचीं संतानें यांच्या कुळासं जबूलुनाच्या वंशांतलें यकनाम व त्याचे शिवार, कार्त व त्याचे शिवार; ३५ दिन्ना व त्याचे शिवारा, नाहलाल व त्याचे शिवार, असीं नगरें चार दिल्हीं; ३६ आणि रऊबेनाच्या वंशांतलें बेजेर व त्याचे शिवार, आणि याहजा व त्याचे शिवार; ३७ कदेमोथ व त्याचे शिवार, आणि मेफाथ व त्याचे शिवार, असीं नगरें चार दिल्ही; ३८ आणि गादाच्या वंशांतलें हत्या करणा-याच्या आश्रयाचें नगर गिलादांतलें रामोथ व त्याचे शिवार, माहनाइम व त्याचे शिवार; ३९ हेशबोन व त्याचे शिवार, याजेर व त्याचे शिवार, सर्व नगरें चार दिल्हीं. ४० लेव्यांच्या कुळांतली राहिलेलीं म्रारीचीं संतानें त्यांचा कुळांप्रमाणें त्यांचीं सर्व नगरें, म्हणजे त्यांचा देवखूणाचीं नगरें बारा होतीं. ४१ इस्त्राएलच्या संतानांच्या वातनाम्ध्यें लेव्यांचीं सर्व नगरें, अठ्ठेताळीस नगरें व त्यांचे शिवार. ४२ ती नगरें असीं होतीं कीं नगराचें नगर व त्यच्या त्याच्या चहूंकडले त्याचे त्याचे शिवार, असे त्य सर्व नगरांस होतें. ४३ याप्रमाणे परमेश्वराने इस्त्राएलास जो देश त्यांच्या पूर्वजांस द्दायाला शपथ वाहिली होती तो अवघा दिल्हा; आणि ते त्याला वतनरूपें पावून त्यांत राहिलें. ४४ आणि परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जसी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेंच त्यांस चहुंकडून विसांवा दिल्हा, असा कीं त्याच्या सर्व शत्रुंतला कोणी त्यांच्यापुढें टिकला नाहीं; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रु त्यांच्या हातीं दिल्हे. ४५ परमेश्वराने इस्त्राएलाच्या घराण्यास जी कांहीं बरी गोष्ट सांगितली होती, तींतले काहीं राहिलें नाहीं; अवघें प्राप्त झालें.