२२
१ तेव्हा यहोशवाने रऊबेनी व गादी व मनाश्श्याचा अर्धा वंश यांस बोलाविलें; २ आणि त्यांस म्हटलें, ''परमेश्वराचा सेवक मोशे याने जें आज्ञेकरून तुम्हास सांगितलें तें अवघें तुम्ही पाळिलें; आणि जें म्या आज्ञेने तुम्हास लाविलें, त्या अवघ्याविषयीं तुम्ही माझी गोष्ट ऐकिली आहे. ३ आजपर्यत बहुत दिवस तुम्ही आपल्या भावांस न सोडतांना आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचें पाळन केलें आहे. ४ आणि तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या भावांस जसें सांगितलें होतें, तसा आतां त्यांस विसांवा दिल्हा आहे; यास्तव तुम्ही आपला वतनी देश, जो परमेश्वराचा सेवक मोश्याने यार्देनेच्या पलिकडे तुम्हास दिल्ही, त्यांत आपल्या राहोटयांस आतां माघारे जा. ५ परतुं ज्या आज्ञा आणि जें शास्त्र परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञेकरून तुम्हास सांगितलें, त्याप्रमाणें तुम्ही चालावें, म्हणजे तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करावी, आणि त्याच्या सर्व मार्गात चालावें, आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्यासीं जडून राहावें, आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार संभाळा.'' ६ आणि यहोशवाने त्यांस आशीर्वाद देऊन निरोप दिल्हा, मग ते आपल्या राहोटयांस गेले. ७ मनाश्याच्या अर्ध्या वंशाला मोश्याने बाशानांत वतन दिल्हें होतें; परंतु त्याच्या दुस-या अर्ध्याला यहोशवाने त्यांच्या भावांसंगतीं पश्चिमेस यार्देनेच्या अलिकडे दिल्हें; अणखी जेव्हां यहोशवाने त्यांस त्यांच्या राहोटयांकडे जायाला निरोप दिल्हा, आणि त्यांस आशीर्वाद दिल्हा. ८ तेव्हां त्याने त्यांस असें सांगितलें कीं, ''बहुत द्रव्य व फारफार पशुधन, रूपें व सोने व तांबें व लोखंड व फारफार वस्त्रें घेऊन तुम्ही आपल्या राहोटयांस माघारे जा; आपल्या भावांच्यासंगतीं आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.'' ९ यास्तव रऊबेनाचीं संतानें व गादाचीं संतानें व मनाश्श्याचा अर्धा वंश खनानाच्या देशांतल्या शिलोपासून इस्त्राएलाच्या इतर संतानातून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोश्याच्या योगें परमेश्वराने सांगितल्यावरून आपला वतनी झाला, त्यांत जायास माघारें चालले. १० तेव्हा यार्देनेजवळचें गलीलोथ खनान देशांत आहे, तेथें रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनाश्श्याचा अर्धा वंश पोहंचल्यावर, त्यानी तेथें यार्देनेवर वेदी आकाराले मोठी असी वेदी बांधिली. ११ मग इस्त्राएलाच्या इतर संतानानी असें ऐकिलें कीं, ''पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनाश्श्याचा अर्धा वंश यानी खनान देशासमोर यार्देनेवरलें गलीलोथ, जेथें इस्त्राएलाचीं संतानें उतरून आलीं होतीं तेथें एक वेदी बांधिली आहे.'' १२ असें जेव्हा इस्त्राएलाच्या संतानानी ऐकिलें, तेव्हां इस्त्राएलाच्या संतानांचा सर्व समुदाय. त्यांवर सैन्यरूपें जायाला शिलोमध्यें मिळाला. १३ आणि इस्त्राएलाच्या संतानानी गिलाद देशांत रऊबेनाचीं संतानें व गादाचीं संताने व मनाश्श्याचा अर्धा वंश यांजवळ एलाजार याजक याचा पुत्र फीनहास याला पाठविलें. १४ आणि त्याच्यासंगतीं इस्त्राएलाच्या सर्व वंशांतल्या पूर्वजाच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दाहा अधिकारी पाठविले; आणि हजार हजार इस्त्राएलावर ते एकएक आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांत मुख्य होते.त १५ तेव्हां गिलाद देशांत रऊबेनाचीं संतानें व गादाचीं संतानें व मनाश्श्याचा अर्धा वंश याजवळ ते येऊन त्यांस असें बोलले कीं, १६ ''परमेश्वराच्या सर्व समुदाने असें म्हटलें कीं, 'तुम्ही इस्त्राएलाच्या देवाविषयीं असें उल्लंघन कां केलें? कीं आज परमेश्वराला अनुसरणें यांतून फिरून आपल्यासाठीं वेदी बांधिली, येणेकरून आज तुम्ही परमेश्वराविषयीं फितूर केला आहे. १७ पौर देवावरून जो आम्हाकडला अन्याय तो लाहान कीं काय? त्यापासून आम्ही आजपर्यंत शुध्द झालों नाहीं, आणि परमेश्वराच्या समुदावर पटकी प्राप्त झाली होती. १८ तुम्हीहि परमेश्वराला अनुसरणें यापासून आज वळलां, आणि परमेश्वरावर तुम्ही आज फितून केला, म्हणून असें होईल कीं उद्दां इस्त्राएलाच्या सर्व समुदायावर त्याचा क्षोभ होईल. १९ आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुध्द असला, तर अगत्य परमेश्वराने वतनास दिल्हेला आहे, तेथें तुम्ही नदी उतरून या, आणि आमच्यामध्यें वतन घ्या; परंतु तुम्ही आपल्यासांठी आमचा देव परमेश्वर याच्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वरावर फितूर करूं नका, आणि आम्हावर फितूर करूं नका. २० जेराहाचा पुत्र आखान याने उत्सृष्ट वस्तुविषयीं उल्लंघन केलें, आणि इस्त्राएलाच्या सर्व समुदायावर क्षोभ झाला, असें नाहीं कीं काय? आणि तो पुरूष आपल्या अन्यायामुळें एकटाच. मेला नाहीं.'' २१ तेव्हां रऊबेनाचीं संताने व गादाचीं संताने व मनाश्श्याचा अर्धा वंश यानी इस्त्राएलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकार होते त्यांस उत्तर देतां असें म्हटलें, २२ ''परमेश्वर देव तोच देव, परमेश्वर देव तोच देव आहे, तो जाणतो; आणि इस्त्राएल आहे, तो जाणेल कीं फितुराने नाहीं, आणि परमेश्वराविषयीं उल्लंघनाने नाहीं; असली तर, आजच्या दिवसीं तूं आम्हास तारूं नको; २३ म्हणजे परमेश्वराकडल्या अनुसरण्यापासून फिरल्याने आम्ही आपल्यासाठीं वेदी बांधिली नाहीं; आणि जर तिजवर होम किंवा नैवेद्द करायाचा असला किंवा तिजवर शांतिकारक यज्ञ करायाचे असले तर परमेश्वर स्वतां झाडा घेवो. २४ परंतु निश्चयेंकरून याच गोष्टीच्या भयाने आम्ही हें केलें; आम्ही असें म्हटलें कीं, पुढल्या काळीं तुमचीं संतानें आमच्या संतानांस असें म्हणतील कीं, 'इस्त्राएलाचा देव परमेश्वर यासीं तुमचा संबंध काय आहे? २५ कां कीं रऊबेनाचीं संतानें व गादाचीं संतानें या तुमच्यामध्यें आणि आमच्या मध्यें परमेश्वराने यार्देन ही सीमा लाविली आहे; तुम्हास परमेश्वराकडला वांटा नाहीं.' असीं तुमचीं संताने आमच्या संतानांस परमेश्वराच्या भक्तीपासून फिरवितील. २६ यास्तव आम्ही म्हटलें कीं, 'आपण आपल्यासाठीं हें अगत्य करावें, म्हणजे वेदी बांधावी; होमासाठीं नव्हे, आणि यज्ञासाठीं नव्हे; २७ परंतु आमच्या व तुमच्यामध्यें, आणि आमच्यामागें आमच्या पिढयांमध्यें हें साक्ष देण्यासाठीं व्हावें; असी कीं आम्ही परमेश्वरापुढें आपल्या होमानी व आपल्या यज्ञानी व आपल्या शांतिकारक यज्ञानी त्याचीं सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळीं तुमच्या संतानानी आमच्या संतानांस असें व म्हणावें कीं तुम्हास परमेश्वराकडला वांटा नाहीं. २८ यास्तव आम्ही म्हटलें कीं, 'जेव्हां तीं पुढल्या काळीं आम्हास किंवा आमच्या पिढीच्या पिढीस बोलतील, तेव्हां असें होईल कीं आम्ही असें म्हणूं कीं तुम्ही परमेश्वराच्या वेदिची प्रतिमा पाहा; ही आमच्या पूर्वजानी केली आहे, होमासाठीं नव्हे, व यज्ञासाठीं नव्हे, परंतु ही आमच्या व तुमच्यामध्यें साक्ष देण्यासाठीं आहे. २९ आमचा देव परमेश्वर याच्या मंडपाच्यासमोर जी त्याची वेदीखेरीज आम्ही होमासाठीं, नैवेद्दासाठीं, किंवा यज्ञासाठीं दुसरी वेदी बांधून परमेश्वरावर फितूर करावा, म्हणजे आम्ही आज परमेश्वराकडल्या अनुसरण्यापासून फिरावें, हा आम्हास अति अधर्म आमच्याने व्हायाचा नाही.'' ३० तेव्हां रऊबेनाचीं संतानें व गादाचीं संतानें व मनाश्श्याचीं संतानें यानी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फीनहा, याजकाने व त्याच्यासंगतीं जे समुदायाचे अधिकारी व इस्त्राएलाचे हजार लोकांमध्यें जे जे मुख्य पुरूष यानी ऐकिल्या, तेव्हां त्यांस बरें वाटलें. ३१ यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फीनहास यांने रऊबेनाचीं संतानें व गादाचीं संतानें व मनाश्श्याचीं संतानें यांस सांगितलें, ''आज आम्हास कळलें कीं परमेश्वर आमच्यामध्यें आहे; कारण कीं तुम्ही परमेश्वराविषयीं तें उल्लंघन केलें नाहीं; येणेकरून तुम्ही इस्त्राएलाच्या संतानांस परमेश्वराच्या हातांतून सोडविलें आहे. ३२ मग रऊबेनाचीं संताने व गादाचीं संतानें यांपासून गिलाद देशांतून एलाजार याजक याचा पुत्र फीनहास व ते अधिकारी यानी खनान देशांत इस्त्राएलाच्या संतानांजवळ माघारें येऊन त्यांस वर्त्तमान सांगितलें. ३३ तेव्हां तें वर्त्तमान इस्त्राएलाचिया संतानांस बरें वाटलें, आणि ज्या देशांत रऊबेनाचीं संताने व गादातीं संतानें राहिलीं होतीं, त्याचा नाश करायास त्यांवर सैन्यरूपें जावें म्हणून म्हटलें नाहीं. ३४ तेव्हा रऊबेनाचीं संतानें व गादाचीं संतानें यानी त्या वेदीला साक्षीचें असें नांव दिल्हें; कां तर त्यानी म्हटलें कीं, ''तें आपल्यामध्यें असीं साक्ष देईल कीं परमेश्वरच देव आहे.