२४
१ तेव्हां यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमांत एक्वट करून इस्राएलाचे वडील व त्याचे मुख्य पुरुष व त्याचे न्यायाधीश व त्यावरले कारभारी यांस बोलाविलें, म्हणून ते देवापुढें सिद्ध झाले. २ तेव्हां यहोशवाने सर्व लोकांला सांगितलें, “ इस्राएलाचा देव परमेश्र्वर असे म्हणतो कीं, 'पूर्वकाळीं तुमचे पूर्वज नदीच्या पलिकडे राहत होते; आब्राहामाचा बाप व नाहोराचा बाप तेराह तेथें होता; तेव्हां त्यानी दुसऱ्या देवांची सेवा केली. ३ परंतु त्या तुमचा पूर्वज आब्राहांम याला नदीच्या पलिकडून आणीलें, आणि त्याला संपूर्ण खनान देशांत फिरविलें; तेव्हां म्या व्याचें संतान वाढवावें म्हणून त्याला इझाक दिल्हा, मग त्या इझाकाला याकोब व एसाव दिल्हा, ४ तेव्हा एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिल्हा, परंतु याकोब व त्याचीं संतानें मीसरांत उतरलीं ५ मग म्या मोशे व आहरोन यांस पाठवून मिसरांत जें केलें, त्या अवघ्याप्रमाणें मारिलें, आणि मग म्या तुम्हास काढिलें. ६ तेव्हा म्या तुमच्या पूर्वजांस मिसरांतून बाहेर आणिलें; नंतर तुम्ही समुद्रापर्यंत आलों, तेव्हां मिसरी, रथ व घोडे घेऊन, सुफ समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांच्या पाठीस लागले. ७ तेव्हा त्यानी परमेश्र्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्यें काळोख लाविला, आणि समुद्र त्यांवर आणून त्यांस बुडविलें; म्या मिसरांत जें केलें, ते तर तुमच्या डोळ्यानी पाहिलें, आणि मग तुझी रानांत बहुत दिवस राहिलां. ८ मग जे अमोरी यार्देनेच्या पलिकडे राहत होते, त्यांच्या देशांत म्या दुम्हास आणिलें; तेव्हां त्यानी तुम्हासीं लढाई केली, परंतु म्या ते तुमच्या हातीं दिल्हे, आणि तुम्ही त्यांच्या देश वतन करून घेतला; कां कीं म्या त्यांस तुमच्यापुढून त्यांचा नाश करून घालविलें. ९ नंतर जीप्पोराचा पुत्र खालक जो मोवाबी राजा, त्याने उठून इस्राएलासी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बोराचा पुत्र बलाम याला तुम्हास शाप द्दायासाठीं बोलाविलें. १० परंतु बलामाचें एकयास मी मान्य झालों नाहीं; यास्तव त्याने तुम्हास आशीर्वादच दिल्हा, आणि म्या तुम्हास त्याच्या हातांतून सोडविलें. ११ मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आलां, तेव्हां यरीहोचे धनी अमोरी, आणि परिज्जी व खनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबुसी, यानी तुम्हासीं लढाई केली, परंतु म्या ते तुमच्या हातीं दिल्हे; १२ म्हणजे म्या तुमच्यापुढें गांधीलमाशा उठविल्या, आणि त्यानी त्यांस तुमच्या समोरून घालविलें; अमोऱ्याचे दोन राजे यांस घालविलें; तुझ्या तरवारीने आणि तुझ्या धनुष्यानेहि हें झालें नाही. १३ याप्रमाणे ज्या देशाविषयीं तुम्ही श्रम केले नाहींत, आणि जीं नगरें तुम्ही बांधिलीं नाहींत तीं म्या तुम्हास दिल्हीं आहेत, आणि तुझ्यी त्यांत राहिलां आहा; द्राक्षामुळें व जेतुनबनें जीं तुम्ही लाविलीं नाहींत, त्यांचे तुम्ही फळ खाता. १४ तर आतां तुम्ही पूर्णपणाने व सत्यतेने परमेश्र्वराला भिऊन त्याची सेवा करा, आणि नदीच्या पलिकडे व मिसरांत तुमच्या पूर्वजानी ज्या देवांची सेवा केली, त्यांस दूर करून परमेश्र्वरा चीच सेवा करा. १५ किंवा परमेश्र्वराची सेवा करणें हें जर तुम्हास वाईट वाटतें, तर तुम्ही ज्याची सेवा कराल, त्याला आज आपल्यासाठीं निवडून घ्या; नदीच्या पलिकडे तुमच्या पूर्वजानी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशांत तुम्ही राहतां त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरचीं माणसें आम्ही परमेश्र्वराची सेवा करूं.” १६ तेव्हां लोकानी असें उत्तर केलें कीं, “तो आम्हाला अति अधर्म ! परमेश्र्वराला सोडून दुसऱ्या देवांची सेवा आमच्याने करवत नाही; १७ कां तर परमेश्र्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हास व आमच्या पूर्वजांस मिसर देशांतून, दास्यांच्या वस्तींतून वर आणिलें ; आणि ज्याने आमच्या देखता ते मोठे चमत्कार केले, आणि आम्ही ज्या अवघ्या वाटेने चाललों तींत, व ज्या राष्ट्रांमध्ये फिरलों त्यांत आम्हास पाळिलें, तोंच तो आहे. १८ आणि देशांतल्या राहणाऱ्या अमोऱ्यांसुद्धा सर्व राष्ट्रांच परमेश्र्वराने आमच्यापुढून घालविलें आहे; आणखी परमेश्र्वर आमचा देव आहे म्हणूनही आम्ही त्याची सेवा करूं.” १९ तेव्हा यहोशवाने लोकांस सांगितलें, “तुमच्याने परमेश्र्वराची सेवा करवणार नाही; कारण कीं तो अतिपवित्र देव; तो आपल्या मानाविषयीं आवेशी असा देव आहे; तो तुमच्याउल्लंघनाची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाहीं. २० निश्वयें तुम्ही परमेश्र्वराला सोडून अन्य देवांची सेवा कराल, आणि त्याने तुमचें बरें केल्यानंतर, तो उलटून तुमचें वाईट करील, तुमचा क्षयहि करील.” २१ तेव्हां लोकानी यहोशवला म्हटलें, “असें नाही, निश्वयें आम्ही परमेश्र्वराची सेवा करू.” २२ तेव्हा यहोशवाने लोकांला म्हटलें, तुम्ही आपल्यावर असे साक्षी आहा कि तुझी परमेश्र्वराची सेवा करायास त्याला आपल्यासाठीं निवडून घेतलें आहे.” नंतर त्याने म्हटले, “आम्ही साक्षी आहो.” २३ तेव्हा तो बोलला, “असें आहे तर आता तुमच्यामध्यें जे अन्य देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपलें अंत:करण इस्त्राएलाचा देव परमेश्र्वर याकडे लावा.” २४ तेव्हां लोकांनी यहोशवला म्हटलें, “आमचा देव परमेश्र्वर याची सेवा आम्ही करूं; त्याचें वाक्य आम्ही ऐकूं.” २५ असा त्याच दिवसी यहोशावाने लोकांकडून करार करविला, आणि शखेमांत त्यांच्याजवळ नेम व नाति स्थापिली. २६ तेव्हां यहोशवाने हीं वाक्यें देवाच्या शास्त्राच्या पुस्तकांत लिहिलीं, आणि मोठी धोंड घेऊन, तेथें परमेश्र्वराच्या पवित्र स्थानी जें आला झाड, त्याच्याखालीं ती उभी केली. २७ आणि यहोश्वाने सर्व लोकांस म्हटलें, “पाहा, ही धोंड आमच्याविषयीं साक्षीरुप होईल, कारण कीं परमेश्र्वराणे आपलीं जीं सर्व वाक्यें आमच्याजवळ सांगितलीं तीं हिने एकिलीं आहेत; तर ही तुम्हाविषयीं साक्षीरुप यासाठीं व्हावी कीं तुम्ही आपल्या देवाविषयीं लबाडी न करावी.” २८ मग यहोशवाने लोकांस त्यांच्या त्यांच्या वतनाकडे रवाना केलें. २९ मग ह्या गोष्टी झाल्यावर असें झाले कीं नुनाचा पुत्र परमेश्र्वराचा सेवक यहोशवा एकशें दाहा वर्षांचा होऊन मेला. ३० मग त्याच्या वतनाच्या सीमेंत एफ्राइमाच्या डोंगरवटीवर जे थिम्नाथसेराह आहे त्यांत, गाश डोंगराच्या उत्तरेस लोकांनी त्याला पुरिलें. ३१ आणि यहोशवाच्या सर्व दिवसांत, आणि जे वडील यहोशवाच्या मागें अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्र्वराने आपलें जे काम इस्राएलासाठीं केलें होतें, ते अवघें ज्यांनी पाहिलें होतें, त्याच्या सर्व दिवसांत इस्राएलानी परमेश्र्वराची सेवा केली. ३२ आणि शखेमांत जो शेतभूमीचा विभाग याकोबाने शखेमाचा बाप ह्मोर याच्या संतानांजवळून शंभर कोकरूं मुद्रिकांवर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनांचा झाला त्यांत, योसेफाच्या जीं हाडें इस्राएलाच्या संतानानी मिसरांतून वर आणिलीं होती, तीं त्यानी पुरिलीं. ३३ आणि याहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हां त्याचा पुत्र फीनहास याची टेकडी जी एफ्राइमच्या डोंगरवटींत, याला दिल्ही होती, तिजवर त्यांनी त्याला पुरिलें.