२४
१ पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत. २ परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्याने नद्यांवर निर्माण केली. ३ परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? ४ तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील. ५ चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात. ६ ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात. ७ वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. ८ तो गौरशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे. ९ वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. १० तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.