६७
१ देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर! २ देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे. ३ देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत. ४ सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस. ५ देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत. ६ देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो. ७ देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.