१००
१ हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा. २ परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या. ३ परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत. ४ त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा. ५ परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.