१२२
१ मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे? २ माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे. ३ देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही. ४ इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही. ५ परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो. ६ ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही. ७ परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. ८ परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. ९ परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.