१३४
१ परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली. २ सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा. ३ आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.