१ आता बवाज वेशीत जाऊन बसला.आणि इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातेवाईकाबद्दल बोलला होता तोहि तेथे आला.तेव्हा हा त्याला म्हणाला,येथे यऊन बस. तोहि तेथे जाऊन बसला. २ आणि गावातील दहा वडील पुरुषास बोलावून आणि म्हणाला, तुम्ही इकडे येऊन बसा. आणतेहि बसले. ३ मग तो त्या जवळच्या नातेवाईकीस म्हणाला, मवाब देशातून नामी आली आहे. ती तुझ्या माझ्या बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे. ४ आणि तुला हे कळवावे, आणि येथे या बसलेल्यासमोर आणि माझ्या वडिलजनांसमोर तू तो विकर ध्यावा.तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, आणि तुझ्यानंतर मी आहे.मी खंडून घेईल ५ मग बवाज म्हणालाज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्यादिवशी मेलेल्याची बायको मवाबी रूथ हिच्याकडूनहि तुला ते विकत घ्यावे लागेल,त अशासाठी की मेलेल्याचे नाव त्याच्या वतनाला चालावे. ६ आणि तो जवळचा नातलग म्हणाला, माझ्याच्याने ते आपल्याकडे खंडणी भरून सोडवत नाही.सोडवले तर माझ्या वतनाचा माझ्याकडून बिघाड होईल.माझ्याने ते खंडणी भरून सोडवत नाही, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे. ७ वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून व्यवहार पक्के करण्याची पूर्वी इस्त्राएलात एक पध्दत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्यास देत असे. ८ तो जवळचा नातलग बवाजास म्हणाला, तूच ते विकत घे.आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या. ९ आणि बवाज त्या वडिल जनास व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. १० याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून तिचा स्विकार करतो.ते यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनाच कायम रहावे,मयताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये. ११ तेव्हा वेशीतील लर्व लोक व वडील जन म्हणाले, आम्ही साक्षी आहो,ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे इस्त्राएल घराण्याशी स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ यांच्यासारखे करो.एफ्राथा येथे भरभराट आणि वेथलेहेमांत कीर्ती होवो. १२ आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे यानववधूच्या पोटी परमेश्र्वर जे संतान देईल त्याच्यासारखे होवो. १३ मग बवाजाने रूथेशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्र्वाराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. १४ तेव्हा बायका नामीस म्हणाल्या, परमोश्र्वर धन्यवादित असो, कारण तुला जवळत्या नातलगाशिवाय राहू दिले नाही.आणि त्याचे नाव इस्त्राएलाल प्रसिध्द होवो. १५ आणि तो तुला पुन्हा जीवन देणारा व म्हातारपणी सांभाळणारा असा होईल,कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे,तिला तो झाला आहे १६ तेव्हा नामीने ते बालक घेतले,आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली. १७ आणि नामीला मुलगा झाला असे म्हणून शेजारणीनी त्याचे नाव ओबेद ठेवले.तो इशायाचा पिता व दाविदाचा आजा झाला. १८ आता ही पेरेशाची वंशावळ आहे.पेरेस हेस्त्रोनाचा पिता झाला, १९ हेस्त्रोन रामचा पिता झाला आणि राम अम्मीनादाबाचा पिता झाला, २० आणि अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला आणि नहशोन सल्मोनाचा पिता झाला , २१ आणि सल्मोन बवाजाचा पिता झाला आणि बवाज ओबेदाचा पिता झाला २२ ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दावीदाचा पिता झाला.