१४
 १ आणि खनान देशांत इस्राएलच्या संतानांस जी वतनें झालीं, म्हणजे एलाजार याजक व नुणाचा पुत्र यहोशवा वइस्राएलच्या संतानांच्या वंशाचे वृद्ध अधिकारी यानी त्यास जीं वतनें दिल्हीं ती हींच.  २ परमेश्र्वराने मोश्याच्या योगें नऊ वंशाविषयीं व अर्ध्या वंशाविषयीं जसी आज्ञा दिल्ही, तसें देवखुनांवरून त्यांचें वतन झालें.  ३ कां तर अडीच वंशास मोश्याने यार्देनेच्या पलिकडे वतन दिल्हें होतें, परंतु त्यांच्यासंगतीं लेव्यांस वतन दिल्हें नाहीं.  ४ कां कीं योसेफाचीं संतानें दोन वंश मानाश्ये व एर्फ्राईम असे होते, आणि लेव्यांस देशांतही त्यांनी वांटा दिल्हा नाहीं, केवळ वस्तीसाठी नगरें, आणि त्यांच्या पशुंसाठीं व त्यांच्या मालमतेसाठीं त्यांजवळचे शिवार दिल्हे.  ५ जसी परमेश्र्वराने मोश्याला आज्ञा दिल्ही होती, तसे करून इस्राएलाच्या संतानानी देश वांटून घेतला.  ६ आणि यहुदाचीं संतानें गीलगालांत यहोशवाजवळ आलीं, तेव्हा कनिज्जी यफुत्रे याचा पुत्र कालेब तो त्याजवळ बोलला, “कादेशबार्ण्यामध्यें परमेश्र्वराने देवाचा माणूस मोशे याला मजविषयी व तुबविषयी जी गोष्ट सांगितली, ती तू जाणव आहेस.  ७ परमेश्र्वराचा सेवक मोशे याने जेव्हा मला कादेशबार्ण्यापासून देश हेरावाला पाठीविलें, तेव्हा मी चाळीस वर्षाचा होतो, आणि माझ्या मनांत असी गोष्ट, तसीच म्या त्याजवळ परत आणिली.  ८ तेव्हा माझे भाऊ जे माझ्यासंगतीं चढून गेले, त्यानी लोकांचे हुद्य घाबरें केलें, परंतु मी आपला देव परमेश्र्वर याला पूर्ण अनुसरलों.  ९ तेव्हा त्याच दिवशी मोश्याने शपथ वाहून सांगितलें कीं, 'ज्या देशावर तुझा पाय पडला, तो निश्र्वयेंकरून तुझें व तुझ्या संतानांचे वतन असा सर्वकाळ होईल; कारण कीं तूं माझा देव परमेश्र्वर याला सर्व प्रकारें अनुसरलास.'  १० तर आता पाहा इस्राएलाच्या रानांत चालत असतां परमेश्र्वराने सांगितलें होतें, तसें त्याने मला या पंचेतालीस वर्षात वाचविलें आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाएशी वर्षांचा आहे.  ११ जेव्हा मोश्याने मला पाठविलें होतें, तेव्हाच्या दिवसाप्रमाणें मी आजपर्यंत बळकट आहें. तेव्हां जसी माझी शक्ती होती, तसीच आतां लढायास व जाणें येणें करायास माझी शक्ती आहे.  १२ तर परमेश्र्वराने त्य दिवसीं ज्या डोंगराविषयीं सांगितलें, तो हा आता मला दे ; कां तर त्या दिवसीं त्या ऐकीलें कीं, ' तेथें अनाकी, आणि नगरें मोठीं व बंदोबस्तीचीं आहेत; जर परमेश्र्वराने सांगितलें, तसें मी त्यांस वतनांतून घालवीन.”  १३ तेव्हा यहोशवाने त्याला आशीर्वाद दिल्हा; आणि यफुनन्याचा पुत्र कोलेब याला हेब्रोनाचें वतन दिल्हें  १४ यास्तव कनिज्जी यफुना याचा पुत्र कालेख याचेंहेब्रोन वतन आजपर्यंत चालत आलें; कारण की तो इस्त्राएलचा देव परमेश्र्वर याला पूर्ण अनुसरला.  १५ तर पूर्वकाळीं हेब्रोनाचें नांव किर्यावअर्बा होतें; तो अरर्बा अवाक्यांमध्ये मोठा माणूस होता; तेव्हा लढाईविषयी देश स्वस्थ झाला.