परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता
1जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो,
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
2तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील;
तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
3तुझी पत्नी तुझ्या घरात
फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या
जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
4होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो,
तो असा आशीर्वादित होईल.
5परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो;
तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.
6तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत.
इस्राएलावर शांती असो.