परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती
1अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा;
अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा.
2कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे,
आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे.
परमेश्वराची स्तुती करा.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी