१ तेव्हां यरूब्बाल तोच गिदोन, आणि त्याच्या संगतीं जे सर्व लोके त्यानीं सकाळीं उठून हरोद झ-याजवळ तळ धरिला, आणि त्यावर मिद्दानीं तळ मोरे डोंगराच्या उत्तरेस खिंडींत होता. २ तेव्हा परमेश्वर गिदोनाला बोलला, ''तुझ्यासंगतीं जे लोक ते फार आहेत, यावरून म्या मिद्दान त्यांच्या हातीं न द्दावा; नाहीं तर इस्त्राएल मजविरूध्द नांवाजून घेतांना म्हणेल कीं 'मी आपल्याच हाताने तरलों.' ३ तर आता तूं अगत्य लोकांच्या कानीं असें सांग कीं, 'जो कोणी भित्रा असेल, त्याने मागें फिरावें, म्हणजे मोठ्या सकाळीं गिलाद डोंगरावरूनिघावें.'' तेव्हां लोकांतून बावीस हजार माघारे फिरलें, आणि दाहा हजार राहिले. ४ मग परमेश्वर गिदोनाला बोलला, ''अद्दाप लोक फार आहेत; तूं त्यांस खालीं पाण्याजवळ ने, म्हणजे मी तेथें तुझ्यासंगतीं यावें,' तो तुझ्यासंगतीं जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयीं मी तुला सांगेन कीं, ''याने तुझ्यासंगतीं न यावें, तो न जावो.'' ५ मग त्याने लोकांस खालीं पाण्याजवळ नेलें; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितलें, ''जसा कुत्रा चाटीत पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटीत पाणी पिईल, त्याला तूं एकीकडे ठेव; आणि जो कोणी प्यायास आपल्या गुडघ्यांवर टेंकेल, त्याला एकीकडे ठेव.'' ६ तेव्हां जे आपला हात आपल्या तोंडीं लावून चाटीत प्याले, तसे पुरूष गणतीने तीनशें होते, आणि बरकड सर्व लोक पाणी प्यायास आपल्यागुढघ्यांवर टेंकले. ७ नंतर परमेश्वराने मिदोनाला सांगितलें, ''जे तीनशें पुरूष चाटीत प्याले, त्यांकडून मी तुम्हास तारीन, आणि मिद्दान तुझ्या हातीं देईन; यास्तव वरकड सर्व लोकांस आपल्या ठिकाणीं जाऊं दे.'' ८ तेव्हा त्या लोकांना आपल्या हातीं शिधा व आपलीं रणशिंगें घेंतलीं, आणि इस्त्राएलाच्या वरकड सर्व माणसांस त्याच्या त्याच्या घरांस त्याने पाठविलें; केवळ तीं तीनशें माणसें राखलीं; तेव्हां मिद्दानी तळ त्याच्याखालीं खिंडींत होता. ९ आणि त्या रात्रीं असें झालें कीं परमेश्वराने त्याला सांगितलें, ''तूं उठून खालीं तळावर जा, कां तर म्या तो तुझ्या हातीं दिल्हा आहे. १० आणि जर तूं खालीं जायाला भितोल, तर आपला चाकर फुरा याला खालीं तळाजवळ ने. ११ मग ते जें बोलतील, तें तूं ऐक; आणि मग तुझे हात बळकट होतील, आणि तूं उतरून तळावर जासील.'' तेव्हां तळांत जे हत्यारबंद होते, त्यांच्या कांठापर्यत तो आपला चाकर फुरायाला घेऊन खालीं गेला. १२ तेव्हां मिद्दानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडींत पडून राहिलेल्या असतां, टोळांसारिख्या पुष्कळ होत्या, आणि त्यांच्या उंटांची गणती नव्हती; संख्येने समुद्राच्या कांठावरल्या वाळूसारिख्या होत्या. १३ मग गिदोंन गेला, आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असें स्वप्न सांगितलें कीं, ''पाहा, म्या स्वप्न पाहिलें कीं पाहा, सातूंच्या भाकरीने मिद्दानी तळांत लोटत लोटत एका राहोटीपर्यंत येऊन तिने पडावें असें तिला हाणिलें, तिला उलथेंहि केलें, असी ती राहोटी पडली.'' १४ तेव्हां त्याच्या सोंबत्याने उत्तर केलें कीं, ''इस्त्राएली माणूस योवाशाचा पुत्र गिदोन याची तरवार, तिजखेरीज हें कांहीं नाहीं; देवाने मिद्दान व सर्व तळ त्याच्या हातीं दिल्हा आहे.'' १५ तेव्हां असें झालें कीं गिदोनाने तें स्वप्न व त्याचा अर्थ ऐकिल्यावर भजन केलें; मग तो इस्त्राएली तळास माघारा येऊन बोलला, ''तुम्ही उठा, कारण कीं परमेश्वराने मिद्दानी तळ तुमच्या हातीं दिल्हा आहे. १६ तेव्हां त्याने त्या तीनशें माणसांच्या तीन टोळ्या केल्या, आणि त्या घागरींमध्यें दीवे होते. १७ तेव्हां त्याने त्यांस सांगितलें, ''तुम्ही माझें पाहून तसें करा; आतां पाहा, मी तळाच्या कांठीं जातों, तर असें होवों कीं जसें मी करीन तसें तुम्ही करा. १८ म्हणजे, जें माझ्यासंगतीं त्या सर्वासुध्दां जेव्हां मी रणशिंगे वाजवीन, तेंव्हां तुम्हीहि संपूर्ण तळाच्या चहुंकडे रणशिंगें वाजवीत म्हणा, ''परमेश्वराच्यायोगें व गिदोनाच्यायोगें.'' १९ तेव्हां गिदोन व त्याच्यासंगतीं जीं शंभर माणसें, तीं मधल्या प्रहराच्या प्रारंभीं नुक्तेच त्यानी पाहरेकरी उभे केले होते, तेव्हां तळाच्या कांठीं गेलीं; मग त्यानी रणशिंगें वाजविलीं, आणि आपल्या हातांतल्या घागरी फोडिल्या. २० असें त्या तीन टोळ्यानी रणशिंगे वाजविलीं, आणि घागरी फोडिल्या; मग दिवे आपल्या डाव्या हातीं आणि वाजवायाचीं रणशिंगें आपल्या उजव्या हातीं धरिलीं, आणि ''परमेश्वराच्यायोगें व गिदोनाच्यायोगें तरवार,'' असा हाकाटा केला. २१ तेव्हां ते तळाच्या चहुंकडे आपापल्या ठिकाणीं उभे राहिले; आणि तळांतले सर्व लोक धांवत जातां आरोळी मारीत पळाले. २२ तीं तीनशे माणसें तर रणशिंगें वाजवीत होतीं, आणि परमेश्वराने सगळ्याहि तळांत प्रत्येकाची तरवार आपापल्या शेजा-यावर लागूं केली; आणि जरेरा यांतली खेथशित्ता तेथवर, आणि अबेलमहोला याच्या काठापर्यंत टाब्बाथास तळ पळून गेला. २३ मग नाफताल्यांतलीं व आशेरांतलीं व सगळ्या मनाश्श्यांतलीं इस्त्राएली माणसें बोलावलीं असतां मिद्दान्यांच्या पाठीस लागलीं. २४ आणि गिदोनाने एफ्राइमाच्या सर्वं डोंगरवटीवर दूत पाठवून सांगितलें, ''तुम्ही मिद्दान्यांसीं भिडायाला खालीं खेथबारा व यार्देन तेथवर या आणि त्यांच्यापुढें पाण्याच्या वाटा रोखून धरा;'' असीं सर्व एफ्राइमी माणसें बोलावलीं असतां. त्यानी बेथबारा व यार्देंन तेथवर येऊन पाण्याच्या वाटा रोखून धरिल्या. २५ आणि मिद्दान्याचें दोन अधिकारी ओरेब व ज्येब यांस त्यानी धरिलें; तेंव्हां ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारिलें; असे ते मिद्दान्याच्या पाठीस लागले, आणि त्यानी आरेबाचें व ज्येबाचें शीर यार्देनेच्या अलिकडे गिदोनाजवळ आणिलें.