२१
१ इस्त्राएली माणसानी मिजप्यांत असी शपथ वाहिली होती की, “आमच्यांत कोणीहि आपली कन्या बण्यामिनाला बायको करून न द्दावी.” २ नंतर लोक देवाच्या मंदिरास जाऊन तेथें देवापुढें आजपर्यंत राहिले, आणि आपली वाणी उंच करून फार रडले. ३ आणि त्यानी म्हटलें, “ हे इस्त्राएलाच्या देवा परमेश्र्वरा, इस्त्राएलांत असे कां झालें कीं आज इस्त्राएलांतून एक वंश नाहीसा झाला आहे.” ४ नंतर दुसऱ्या दिवसीं असें झालें कीं लोकांनी पाहाटेस उठून तेथें वेडी बांधिली, आणि होम व शांतिकारक यज्ञ केले. ५ तेव्हां इस्त्राएलाच्या संतानानी म्हटलें, “इस्त्राएलाच्या सर्व वंशांत जो सभेत परमेश्र्वराजवळ चढून आला नव्हता, असे कोण आहे? कां तर जो परमेश्र्वराजवळ मिजप्यांत चढून आला नाहीं त्याविषयीं असी मोठी शपथ होती कीं, त्याला मारावें.” ६ नंतर इस्त्राएलाच्या संतानानी आपला भाऊ बन्यामीन याविषयीं पश्र्वात्ताप करून म्हटलें, “आज इस्त्राएलातला एक वंश छेदला' गेला; ७ जे उरलेले त्यांस बायकाहोण्याविषयीं आम्ही काय करूं? कारण कि आम्ही परमेश्र्वरावरून शपथ वाहिली कीं, आम्ही आपल्या कन्यांतल्या कोणी त्यांस बायका करून देणार नाहीं.” ८ यास्तव त्यांनी म्हटलें, “ इस्त्राएलाच्या वंशांतला जो कोणी मिजप्यात परमेश्र्वराजवळ चढून आला नाहीं; असा कोण आहे?” तेव्हां पाहा, याबेश गिलादांत कोणी छावणीच्या सभेंत आला नव्हता. ९ कां कीं लोकाची झडती घेतली गेली, तेव्हां पाहा, याबेश गिलादार तेथल्या राहणाऱ्यांतला कोणी तेथें आला नव्हता. १० यास्तव सभेने शूर तरणे असे बारा हजार पुरुष तिकडे पाठविले, आणि त्यांस असी आज्ञा दिल्ही कीं, “तुम्ही जाऊन याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांस बायका पोरांसुद्धा तरवारीने मारा. ११ आणि तुम्हाला जें करायचें तें हेंच कीं सर्वे पुरुषांचा, आणि ज्या सर्व स्त्रियांसीं पुरुषानी संग केला आहे, त्यांचाही नाश करावा.” १२ तेव्हा याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांमध्यें ज्यांनी पुरुषाच्या संगकरून माणसाला जाणिलें नव्हतें, अशा चारशें कुमारी त्यांस मिळाल्या; आणि त्यानी त्यांस खनान देशांत शिलोजवल छावणींत आणलें. १३ तेव्हां सर्व सभेने रिम्मोन खडकावर जीं बन्यामीन्याचीं संतानें हातीं त्यांकडे पाठवून त्यांचे समाधान करून बोलाविलें. १४ यास्तव त्या वेळेस बन्यामिनी माघारें आले, आणि यानी यावेश गीलादांतल्या ज्या स्त्रिया बांधविन्या होत्या, त्य त्यांस बायका करून दिल्ह्या; परंतु त्या त्यांस पुऱ्या' झाल्या नाहींत. १५ तर लोकानी बन्यामिनाविषयीं पश्र्वात्ताप केला, कारण कीं परमेश्र्वराने इस्त्राएलाच्या वंशांत खिंडारें केलें होतें. १६ यास्तव सभेच्या वडिलांनी म्हटलें, “जे उरलेले त्यांस बायकाहोण्याविषयीं आम्ही काय करावे? का कीं बन्यामिण्याच्या स्त्रियांचा नाशझाला? १७ अणखी त्यानी म्हटलें, “इस्त्राएलासून एक वश खोडला न जावा, म्हणून बन्यामिनाच्या ठरलेल्यांसवतन प्राप्त व्हावें. १८ आणि आमच्याने आपल्या कन्यांतून त्यांस स्त्रिया करून देववत नाहींत.” कां तर इस्त्राएलाच्या संतानानी असी शपथ वाहिली होती कीं, “जो बन्यामीनाला स्त्री करून देतो, त्यावर शाप असो.” १९ नंतर तें बोलले, “पाहा, शिलोमध्ये परमेश्र्वरासाठीं सन वर्षाच्या वर्षी असतो; ते बेथएलाच्या उत्तरेस आहे, जी सडक बेथएलापासून शखेमास चढून आती, तिजपासून पूर्वेकडे आणि लबानो याच्या दक्षिणेस आहे. २० तर त्यांनी बण्यामिनाच्या संतानांस असी आज्ञा दिल्ही कीं “तुम्ही द्राक्षमल्यामंध्यें द्वा धरा. २१ मग तुम्ही न्याहाळून पाहा; जेव्हां शिलोनतल्या कन्या नाचायाला ताफ्यानी निघतात, तेव्हां तुम्ही द्राक्षमळ्यांतून निघून प्रत्यकाने आपल्यासाठीं शिलोतल्या कण्यातून स्त्री धरून घ्यावी, मग बन्यामीनाच्या प्रांतास जावें. २२ नंतर जेव्हां त्यांचे बाप किवा त्यांचे भाऊ ब्रादी होऊन आमच्याजवळ येतील, तेव्हां असें होईल कीं आम्ही त्यांसी बोलूं, 'तुम्ही त्यांविषयी आम्हावर कृपा करा, कां तर लढाईत आम्ही त्यांतील एकएकासांठी स्त्री घरून ठेविली नाहीं; आणखी तुम्ही त्यांस देऊन या प्रसंगी दोषी झालां नाही.” २३ यास्तव बण्यामिण्याच्या संतानानी तसें केलें कीं आपल्या गणतीप्रमाणें ताफ्यांतून बायका धरिल्या, त्या त्यांनी हिरावल्या. नंतर ते माघारें आपल्या वतनावर गेले, आणि तेथलीं नगरें बांधून त्यांत राहिले. २४ ते त्या वेळेस इस्त्राएलाचीं संतानें तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर गेला. २५ त्या दिवसांत इस्त्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येक आपापल्या दिसण्यांस जें बरें, तें करीत होता.