१ आणि नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता.तो अलीमलेख याच्या कुळांतला असून मोठा धनवान होता. त्याचे नाव बवाज असे होते. २ आणि मवाबी रूथ नामीला म्हणाली,मला शेतात जाऊ दे, म्हणजे ज्याची कृपादृष्टी म्झ्यावर होईल त्याच्यामागून मी सरवा वेचीत जाईल. तेव्हातिने म्हटले जा मुली. ३ मग ती निघून शेतात गेली, आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे वेचू लागली, तेव्हा अलीमलेखाच्या कुळातला बवाज याच्या शेताच्या भागात जाण्याचा योग तिला घडून आला ४ आणि पहा बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला,”परमेश्र्वर तुम्हाबरोबर असो”. आणि त्यांनी उत्तर दिले” परमेश्र्वर तुला आशीर्वादित करो.” ५ मग बवाज कापणी करणाऱ्यांस म्हणाला ही तरुण मुलगी कोणाची? ६ कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्याने म्हटले नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी मुलगी आहे ७ ती मला म्हणाली कृपाकरून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू दे .ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यत वेचीत आहे, थोडा वेळ मात्र ती घरांत बसली होती. ८ बवाज रूथेस म्हणाला,मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचावयास जाऊ नको,येथेच माझ्या तरून नोकरिणीबरोबर राहा. ९ हे ज्या शेताची कापणी करत आहत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा.मी ह्या माणसास तुला स्पर्श न करण्याची सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागेल तेव्हा भरून ठेवलेस्या पाण्याच्या भांड्याकडे जा व त्यातील पाणी पी. १० तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय? ११ आणि बवाज तिला म्हणाला,तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू आपल्या आईवडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परीचिय नाहीत अशा लोकांत तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे. १२ परमेश्र्वर तुझ्याकृतीचे फळ तुला देवो. इस्त्राएलाचा देव परमेश्र्वर याच्या आश्रयास तू आली आहेस, तो तुला पुरे वेतन देवो १३ मग ती म्हणाली ,माझ्या धन्या आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी.मी आपल्या कोणत्याहि दासीच्या बरोबरीची नसून आपण मजशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. १४ आणि भोजनाच्यावेळी बवाज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा.ह्या कढीत आपली भाकर बुडव. त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. १५ ती सरवा वेचावयास निघाली तेव्हां बवाजाने आपल्या गड्यास सांगितले, तिला पेढ्यांत वेचू द्या, मना कर नका. १६ आणि चालता चालता पेंढ्यातून सूठमूठ टाकत जा. तिला वेचू द्या, तिला धमकावू नका. १७ तिने याप्रकारे संध्याकाळपर्यत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले. १८ ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेहि तिला दिले. १९ तिच्या सासूने तिला विचारले, आज तू कोठे सरवा वेचला?हे काम कोठे केलेस?ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो. मग आपण कोणाच्या शेतात काम आज केले ते तिने सासूस सांगितले.ती म्हणाली ज्या माणसाच्या शेतात काम केले त्याचे नाव बवाज. २० नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या परमेश्र्वराने जीवंतावर व मृतांवरहि आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो.नामी तिला आणखी म्हणाली,हा माणूस आपल्या नातलगापैकीआहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे २१ मग मवाबी रूथेने सांगितले की तो मला म्हणाला की माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यत त्याच्या मागोमाग राहा. २२ नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, मुली, तूं त्याच्याच नोकरिणीबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे. २३ याप्रकारे सातूचा आणि गव्हाचा हेगाम संपेपर्यत तिने बवाजाच्या नोकरिणीबरोबर सरवा वेचला.आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.